Kishore Darade expressing happiness with his supporters for winning the MLA election for the second time. esakal
नाशिक

Kishor Darade : पहिलवान दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या सभागृहात; कामातून शिक्षकांत लोकप्रिय झालेले मास्टरमाईंड आमदार किशोर दराडे

Nashik : पहिलवान म्हणून ओळख असलेले विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या सभागृहात पोचले.

संतोष विंचू

येवला : कुस्तीच्या आखाड्यातले पहिलवान म्हणून ओळख असलेले विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या सभागृहात पोचले आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत विभागातून २१ उमेदवार रिंगणात होते. (MLA Kishor Darade who is popular among teachers through his work in legislative council hall)

मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत रंगली. तिरंगी लढतीमुळे ही निवडणूक शेवटपर्यंत चुरशीची झाली. पहिल्या फेरीत तर कोल्हे बरोबर चालल्याने चिंता वाढली होती. मात्र प्लॅनिंगनुसार काम करण्याची खासियत असलेले मास्टरमाईड किशोर दराडे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात खेळलेले काही गेम त्यांना विजयाकडे घेऊन गेले.

कोल्हापूरच्या तालमीत कुस्ती खेळणारा पहिलवान, छोटा हॉटेल व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक ते शिक्षक आमदार असा त्यांचा प्रवास नक्कीच हेवा वाटावा असाच आहे. अचानक राजकारणात एन्ट्री करून अगोदर जिल्हा बँकेचे संचालक आणि २०१८ मध्ये शिक्षक आमदारपदी विराजमान होण्याचा इतिहास त्यांनी रचला आहे. (latest marathi news)

विशेष म्हणजे गेले सहा वर्ष अव्याहतपणे शिक्षकांच्या प्रश्नांवर कधी सभागृहात तर कधी रस्त्यावर उतरून आवाज उठवणारे तर कधी शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसणारे लाल मातीतले पहिलवान किशोर दराडे शिक्षकांच्या मनातही जागा निर्माण करण्यात यशस्वी झाल्याने पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात दिमाखाने प्रवेश केला आहे.

अनेक पदे आणण्यात सिंहाचा वाटा

स्वत: राजकारणात नसतानाही गेले २५ वर्ष राजकारणातील मास्टरमाइंड म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या किशोरभाऊंनी घरात अनेक पदे आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. आता त्यांच्या विजयात बंधू रामदास दराडे, लक्ष्मण दराडे, पुतण्या देविदास, गोकूळ, रूपेश व मुले शुभम व सिद्धांत, पत्नी मीना यांच्यासह कुटुंबीयांचा, आप्तस्वकीयांचा आणि हजारवर शिक्षकांचाही सिंहाचा वाटा राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT