Officers and staff of Mhasrul police station with the two-wheeler thief and the two-wheeler seized from him esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकी चोरट्यासह मोबाईल चोर जेरबंद; म्हसरूळ पोलिस गुन्हे शोध पथकाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : स्टॉप अँड सर्च मोहिमेदरम्यान एका दुचाकी चोरट्यास ताब्यात घेण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश आले आहे. तर दुसऱ्या घटनेतील साडीच्या दुकानातून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे व अंमलदार मखमलाबाद शिवारातील शांतिनगर येथील बस स्टॉपजवळ सोनसाखळी चोरीला प्रतिबंध करण्यासाठी स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते. (Mobile thief jailed with two wheeler thief Mhasrul Police Crime Investigation Team performance )

त्याचवेळी एक संशयित दुचाकीवरून जाताना दिसला. त्यास हटकले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास पोलिसांनी अडविले. संशयित पंडित शेवण दळवी (वय २१, रा. चिखली, ता.पेठ, जि. नाशिक) यास ताब्यात घेतले. त्यास कागदपत्र विचारली असता प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच दुचाकी ही ओझर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच दुसऱ्या घटनेत शुक्रवारी (ता.२६) म्हसरूळ येथील कृष्णापूजा टेक्स्टाईल मार्केट या दुकानात फिर्यादी तथा सेल्समन सलोनी डोंगरे ह्या दुकानात काम करत असताना एक महिला तिचे लहान बाळ व तिचा पतीसह दुकानात साडी खरेदीसाठी आले. सलोनी या साडी घेण्यासाठी आलेल्या महिलेस साडी दाखवत असताना तिच्या पतीने दुकानात साड्यांच्या कप्प्यात ठेवलेला मोबाईल हॅण्डसेट चोरून नेला होता.

या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या मोबाईल चोराचा माग म्हसरूळ गुन्हे शोध पथक माग काढत होते. यात संशयित रंगनाथ भास्कर जगताप (रा. मडकीजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यास चोरलेल्या मोबाईलसह ताब्यात घेतले. अवघ्या काही तासात मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पटारे व अंमलदार यांचे पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त यांनी कौतुक केले आहे.

यांनी बजाविली कामगिरी

ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डहाके, सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे, पोलिस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, सतीश वसावे, कवीश्वर खराटे, देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, पोलिस अंमलदार पंकज चव्हाण, गुणवंत गायकवाड, पंकज महाले, योगेश सस्कर, प्रशांत देवरे, मांदळे यांनी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT