Nashik Police Recruitment : शहर, ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रियेला उद्यापासून (ता. १९) सुरूवात होते आहे. उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या नोंदी अचूक होण्यासाठी ‘आरएफआयडी’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) चीपचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे १००, ८०० आणि १६०० मी. धावण्यासह बायोमेट्रिकल नोंदीही याच आरएफआयडीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठीची सज्जता मैदानावर करण्यात आलेली आहे. (Modern technology will used in Nashik Police Recruitment)
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सुमारे चार महिने लांबलेल्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला आहे. शहरातील ११८ आणि ग्रामीणच्या ३२ रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया सुरू होते आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील भरतीसाठीची मैदानी चाचणी पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम तर, नाशिक ग्रामीणची आडगावच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यासाठी उमेदवारांना पहाटे पाच वाजताच मैदानावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, मैदानी चाचण्यांमध्ये उमेदवारांच्या नोंदींची अचूक नोंद होण्यासाठी यावेळी शहर पोलिस आयुक्तालयाकडून आरएफआयडी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याच तंत्राच्या आधारे मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या बायोमेट्रिक हजेरीसह त्यांची उंची, छातीची नोंद घेतली जाईल. तसेच, १००, ८०० आणि १६०० मीटर धावण्याच्या नोंदीही प्रत्येक उमेदवाराच्या याच तंत्राच्या आधारे नोंदली जाणार आहे. यामागे, पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविण्याचा पोलीस आयुक्तालयाचा उद्देश आहे. (latest marathi news)
असे आहे RFIDचे तंत्र
- उमेदवारांच्या चेस्ट क्रमांक देतानाच RFID चीप त्याच्या चेस्ट क्रमांकाला जोडली जाईल
- बायोमेट्रिक हजेरीची नोंदही त्याच आधारे घेतली जाईल
- उंची मोजताना पायाखाली RFIDची चीप असेल. त्याआधारे त्या उमेदवारांच्या चेस्ट क्रमांकानुसार त्याच्या उंचीची नोंद होईल
- पुरुषांच्या १०० आणि १६०० मीटर धावण्याच्या वेळी दोन्ही बाजुला रेडिओ लहरींची नोंद घेणारे तंत्र जोडण्यात आलेले आहे. उमेदवाराच्या चेस्ट क्रमांकांशी ते तंत्र ट्रॅक करणार असल्याने उमेदवाराने धावण्यास सुरवात केल्याची नोंद आणि परत ते क्रॉस करेल ती अचूक नोंद टिपली जाणार आहे
- अशारितीने महिलांच्या ८०० मी. धावण्याचीही नोंद घेतली जाणार
- शहर आयुक्तालयासाठी पदे : ११८
आलेले अर्ज (पुरुष) : ५५९०
आलेले अर्ज (महिला) : २१२५
आलेले अर्ज (तृतीयपंथी) : २
- ग्रामीणसाठी पदे : ३२
आलेले अर्ज (पुरुष) - २६०२
आलेले अर्ज (महिला) - ५७६
माजी सैनिक - ४२
इतर अर्ज - ५
"मैदानी चाचणीमध्ये अचूक नोंद व्हावी यासाठी आरएफआयडी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे भरतीप्रक्रियेत पारदर्शकता असेल. तसेच शंकेला वाव नसेल. भरतीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे."- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर मुुख्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.