Heavy rains in the city on Sunday led to extensive waterlogging on the roads, with motorists plying their vehicles through the waterlogged Satpur road. esakal
नाशिक

Nashik Monsoon : पावसाच्‍या हजेरीने रविवार ठरला सुखद! दिवसभर रिमझिम बरसल्‍याने वातावरणात गारवा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon : मॉन्‍सून सुरु होऊनही नाशिककरांना पावसाची असलेली प्रतीक्षा रविवारी (ता.२३) संपल्‍याने हा दिवस सुखद ठरला. सकाळी साडेअकराला पावसाला सुरवात होताना, दिवसभर रिमझिम सुरु राहिली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पूर्व मॉन्‍सून पावसाने मे मध्ये झोडपले होते. परंतु जूनमध्ये सुरवात झाल्‍यापासून पावसाच्‍या सरी अपेक्षेप्रमाणे बरसल्‍या नव्‍हत्‍या. काही दिवस तुरळक स्वरूपात पाऊस पडला होता. (Nashik Monsoon cool atmosphere of city due to rain on sunday)

मात्र अवघ्या काही मिनिटांच्‍या पावसामुळे उकाड्याची दाहकता कमी झालेली नव्‍हती. बऱ्याच वेळा ढगाळ वातावरण राहात असतानाही पाऊस ओढ देत होता. त्‍यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना कायम होती. लांबत असलेल्‍या पावसामुळे पाऱ्याचा आलेखही वाढत होता. दरम्‍यान रविवारी सकाळपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण राहात होते. सकाळी साडेअकराला जोरदार पावसाला सुरवात झाली. (latest marathi news)

अचानक आलेल्‍या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. यानंतर दिवसभर शहराच्‍या विविध भागांमध्ये रिमझिम सुरु होती. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्‍या सरी बरसत होत्या. पावसामुळे उकाड्याची दाहकता कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. येत्‍या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्‍याचे नागरिकांना यातून दिलासा मिळणार आहे.

पाऱ्यात घसरण..

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी रिमझिम सरींमुळे पारा घसरण होण्यास मदत झाली आहे. किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस नोंदविले असताना, कमाल तापमान ३०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पावसात सातत्‍य राहिल्‍यास येत्‍या काही दिवसात पारा आणखी घसरणार असल्‍याची शक्‍यता वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT