monsoon esakal
नाशिक

Nashik Monsoon Crisis: जुलैत गेल्यावर्षी पेक्षा 127 टक्के कमी पाऊस; धरणांच्या तालुक्यातही दमदार पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Crisis : जुलै महिन्यातील १७ दिवस उलटले असताना अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२७ टक्के कमी पाऊस पडला आहे.

२०२२ च्या जुलै महिन्यात ५२३ मिली मीटर म्हणजेच १६६ टक्के पाऊस पडल्याने गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूर आलेला होता. यंदा जुलैमध्ये अवघे १२१ मिली मीटर पावसाची नोंद झाल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. (Nashik Monsoon Crisis 127 percent less rainfall in July than last year Waiting for heavy rain in taluka of dams)

धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी व त्र्यंबकेश्वरची ओळख आहे. या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ३३ टक्के व २९ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील धरणांमध्येही पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही.

गोदावरी अद्याप एकदाही खळालेली नसल्याने नाशिककरांना खऱ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक, नांदगाव, चांदवड, येवला, मालेगाव, बागलाण व कळवण या तालुक्यांमध्येही पुरेसा पाऊस पडलेला नाही.

जिल्ह्यात ५० टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्याने पाऊस केव्हा पडेल, याची वाट शेतकरी बघत आहेत. जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरी ३०८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना पहिल्या १७ दिवसांमध्ये १२१ मिली मीटर पावसाची नोंद झाली.

काही ठिकाणी पाच दिवस तर जास्तीत जास्त १४ दिवस पाऊस पडला. पण रिमझिम पावसाने शिवार ओलेचिंब दिसत असले तरी धरण साठ्यात वाढ होण्यासाठी पाहिजे तेवढी मदत झालेली नाही. विहिरींमध्येही पाणी न उतरल्याने पिकांना पाणी देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

दुबार पेरणीचे संकट

दुष्काळग्रस्त तालुके म्हणून ओळख असलेल्या नांदगाव, चांदवड, येवला, सिन्नर व मालेगावच्या काही भागात पेरण्या पूर्ण होत आल्याने आता खऱ्या अर्थाने पावसाची गरज आहे.

मका, कापूस, बाजरीचे पिके जोमात असताना पावसाअभावी त्यांची उंची खुंटत चालली आहे. काही ठिकाणी तर मक्याचे बियाणे अद्याप उगवलेले नसल्याने दुबार पेरणीचे संकट या शेतकऱ्यांवर घोंघावत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुकानिहाय जुलै महिन्यातील पाऊस

तालुका.........पाऊस.... टक्के

मालेगाव.......६१.५........४९.४

बागलाण.......६४.७.........४८.६

कळवण........१११..........६२.३

नांदगाव.......४८.९.........४१.३

सुरगाणा......३८३.८.......५२.७

नाशिक.......८३.५.........३७.७

दिंडोरी.......१९७.१........९२.४

इगतपुरी.......३७७.४.......३३.०

पेठ...........३६०.३........४८.२

निफाड........५२.२........४९.१

सिन्नर........४०.२.........२९.९

येवला......४७.२.........४२.९

चांदवड......५४.३.........३८.८

त्र्यंबकेश्वर.....२५२.६...२८.७

देवळाली.....५८.१........६०.२

एकूण......१२१.९.....३९.५ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT