Maize crop grown in the field of farmer Rajendra Sonwane from Andarsul esakal
नाशिक

Nashik Monsoon Crisis: पिके तरारली; पण जलस्रोत कोरडेच; येवला परिसरात 45 दिवसांत 128 मिमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Crisis : ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवलेकरांना दोन किंवा तीन वर्षांआड दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतोच. मागील दोन वर्षे समाधानकारक गेल्यानंतर यंदा मात्र पावसाने पुन्हा रंग दाखविले आहे.

पावसाळा सुरू होऊन ४५ हून अधिक दिवस झाले. मात्र या काळात सात ते आठ दिवसच पावसाने हजेरी लावली असल्याने आतापर्यंत केवळ १२८ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाल्याने भविष्याची चिंताही वाढत आहे. (Nashik Monsoon Crisis Crops failed water source dry 128 mm rainfall in 45 days in Yewla area)

इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीत पावसाची बऱ्यापैकी स्थिती असून, सिन्नर, निफाड तालुका परिसर मात्र अजूनही तहानलेला आहे. येथे दुबार पेरणीचे संकट कायम आहे.

भौगोलिकदृष्ट्या चार भागात विभागलेल्या या दुष्काळी तालुक्याची राज्यातील टंचाईग्रस्त ९० तालुक्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये क्रमांक लागतो. अर्थात एखादे-दोन वर्ष अल्प पावसाचे गेले, की पुन्हा दोन-तीन वर्षे मात्र पाऊस कृपादृष्टी करतो, हे येथील समीकरण आहे.

मागील दोन वर्ष पावसाने कृपादृष्टी केल्यानंतर यंदा पुन्हा वक्रदृष्टीच केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात झालेला पाऊस रिमझिम स्वरूपाचाच आहे.

सरीवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली असून, या रिमझिमवरच पिके देखील तरारली आहेत. मात्र पुढे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

मृग व आर्द्रा नक्षत्रांप्रमाणेच आत्ताचे पुनर्वसू देखील आले तसेच चालले आहे. येत्या गुरुवारी पुष्य नक्षत्र सुरू होणार असून, यात तरी पावसाची परिस्थिती बदलेल का, याकडेही लक्ष लागले आहे.

शहरात आत्तापर्यंत जून महिन्यात ५ तारखेला एक मिलिमीटर, त्यानंतर थेट २५ जूनला ४० मिलिमीटर पाऊस झाला होता. पुढे २७ ला २५, तर २८ तारखेला २१ मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर थेट ४ जुलैला नऊ, ५ जुलैला सात, तर ६ जुलैला १२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

त्यानंतर ११ जुलैला पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. अर्थात मंडळनिहाय देखील पाऊस कमी-अधिक प्रमाण असून, जळगाव नेऊर, येवला, तसेच पाटोदा मंडळात सर्वांत कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

मुसळधारेची प्रतीक्षा कायम

तालुक्यातील सहा मंडळात कमी-अधिक प्रमाणात परंतु पिके फुलेल असा पाऊस सध्या आहे. मात्र आगामी कांदालागवड व इतर पिकांची गरज पाहता मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.

तालुक्यातील जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ११४ मिलिमीटर असून, ८६ मिलिमीटर पाऊस पडला होता. जुलैचे पर्जन्यमान ५० मिलिमीटर असून, आतापर्यंत ४२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

तर जूनपासून आजपर्यंतची सरासरी १६४ मिलिमीटर असून, १३० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद शासनदरबारी झाली आहे. प्रत्यक्षात परिस्थिती मात्र बिकट असल्याचे दिसते. अद्यापही तालुक्यातील बंधारे, नदी-नाले, विहिरी कोरड्याठाक आहेत.

त्यामुळे कांदे रोपे टाकणे, लागवड करणे व खरीप हंगामासाठी पावसाची गरज असून, नदी-नाले भरणारा धो-धो पाऊस अद्याप येवलेकरांसाठी प्रतीक्षेतच आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रविवारी दिवसभर कोसळल्या सरी

रिमझिमवर पिके जोमात असताना शुक्रवारी तर कडक ऊनही पडल्याने काही भागात पिकांनी माना टाकल्या होत्या. परिणामी, शेतकऱ्यांची चिंताही वाढली होती.

मात्र रविवारी (ता. १६) सकाळपासून शहर व तालुक्याच्या सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात दिवसभर रिमझिम सरी कोसळल्या होत्या. काही भागात दमदार पाऊसही झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहे.

...असा आहे मंडळनिहाय पाऊस

मंडळ - जून - जुलै - एकूण

येवला - ७० - २८ - ९९

नगरसूल - ९२ - ६४ - १५६

अंदरसूल - ७९ - ९४ - १७३

पाटोदा - १०६ - २७ - १३३

सावरगाव - १०४ - २५ - १३०

जळगाव नेऊर - ६६ - १३ - ७९

एकूण - ८६ - ४२ - १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT