Agriculture news Kharif season crop of farmers esakal
नाशिक

Nashik Monsoon Crisis: वरुणराजाच्या ‘बॅकलॉग’मुळे कृषी पंढरीवर काळजीचे ढग; उत्तर महाराष्ट्रात 54 टक्के कमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Crisis : राज्याच्या विविध भागांमध्ये धो-धो पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली असताना हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसांत राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

दुसरीकडे मात्र वरुणराजाच्या ‘बॅकलॉग’मुळे कृषी पंढरीवर काळजीचे ढग जमा झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ५४.४ टक्के कमी म्हणजे ७१.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे खरिपातील उगवण ते वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरीप पिकांचे काय होणार? असा प्रश्‍न तयार झाला. (Nashik Monsoon Crisis'backlog clouds concern over agriculture 54 percent less rainfall in North Maharashtra)

पावसाच्या अभावामुळे राज्यात सर्वाधिक १४९ टँकर उत्तर महाराष्ट्रात सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी ५८, धुळ्यातील एका गावासाठी एक, नंदुरबारमधील एक गाव व दोन वाड्यांसाठी दोन, तर जळगावमधील ३३ गावांसाठी ३५, नगरमधील ५८ गावे आणि ३२६ वाड्यांसाठी ५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खरिपाच्या नाशिक जिल्ह्यात ६२.७, धुळ्यात ७४, नंदुरबारमध्ये ७४, जळगावमध्ये ८७, तर नगर जिल्ह्यात ५३ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.

त्यात उत्तर महाराष्ट्रातील भाताची लागवड झालेले २७.५, नागलीचे २, पेरणी झालेले ज्वारीचे ४५, बाजरीचे ४१.३३, मक्याचे ७९, तुरीचे ५०.२४, मुगाचे ५०, भुईमुगाचे ३५, तिळाचे ९, उडदाचे ३८.४, कारळ्याचे २, सूर्यफुलाचे १२, सोयाबीनचे ८७.५७, कपाशीच्या ९८ टक्के क्षेत्राचा समावेश आहे.

मुळातच, भाताच्या रोपांच्या पुनर्लागवडीला विलंब झाला असल्याने भाताच्या उत्पादनात घटीची भीती व्यक्त करण्यात येते. आता उरलेल्या कालावधीत ३१ जुलैपर्यंत सोयाबीन, मका, बाजरी, तुरीची पेरणी शेतकऱ्यांना करता येणार आहे.

शिंदखेडा भागात कपाशीवर लाल्या रोगाचा आणि आदिवासी भागातील भातावर खोडकीड व करप्याचा प्रादुर्भाव जाणवू लागला.

मुळातच, गेल्या वर्षीचा विचार करता खरिपाच्या ११ टक्के कमी पेरण्या झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, सिन्नर, चांदवड तालुक्यातील पेरण्यांचे प्रमाण कमी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धरणांमध्ये कमी जलसाठा

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील मोठे, मध्यम, लघू अशा एकूण ५३५ धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २७.३१ टक्क्यांनी साठा कमी आहे. गेल्या वर्षी ६०.२६ टक्के जलसाठा झाला होता. सद्यस्थितीत ३२.९५ टक्के जलसाठा झाला आहे.

दरम्यान, जिल्हानिहाय जून-जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस आणि आज सकाळपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये, तर आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून, (गेल्या वर्षी २० जुलैपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची टक्केवारी दर्शविते) : नाशिक- ३७३.७- २३०.३- ६१.३ (१६१.७), धुळे- २३१.८- १८४.१- ७९.४ (१२६), नंदुरबार-३५३.१- २७८- ७८.९ (९२.२), जळगाव- २४५.८- २३०.३- ९३.७ (११७.१), नगर- १७१.१- १२०.३- ७०.३ (१२६.६).

हवामानशास्त्र अभ्यासकांचा अंदाज

हवामानशास्त्राचे अभ्यासक माणिकराव खुळे यांनी पावसाबद्दलचा अंदाज ‘सकाळ’शी बोलताना वर्तविला आहे. ते म्हणाले, की अरबी समुद्रावरून वाहणारे पश्‍चिम वारे घाटमाथा ओलांडून यायला ताकद कमी पडते आहे.

तसेच, बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा अभाव दिसतो आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश भागात पाऊस होत आहे. शिवाय, गुजरातमध्ये पाऊस सुरू आहे. या भागाला लागून असलेल्या धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज आहे.

सह्याद्री पर्वतरांगेतील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचा पूर्वभाग आणि पश्‍चिम मराठवाड्यातील औरंगाबाद, वैजापूर, जालना, बीड, धाराशिवमधील पश्‍चिम भाग या परिसरात २१ ते २७ जुलैदरम्यान पावसाची शक्यता जाणवते. हवामानाची स्थिती चांगली राहिल्यास १ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT