Nashik Monsoon News  esakal
नाशिक

Nashik Monsoon News : पावसाच्या माहेरघरी मॉन्सूनची प्रतीक्षा!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक शहर व परिसरात गुरुवारी (ता. १३) मॉन्सूनच्या पावसाने पाऊण तास हजेरी लावली. शहर व पावसाचे माहेरघर असलेल्या तालुक्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अवर्षणप्रवण तालुके असलेल्या मालेगाव, नांदगाव, चांदवड, सिन्नर व येवला या चार तालुक्यांत मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. (monsoon farmer in Niphad taluka and Nashik city is waiting for rain)

यामुळे दुष्काळ, पाणीटंचाईने हैराण असलेल्या तालुक्यांना काहीसा दिलासा मिळाला. मृग व वळिवाच्या पावसाने दिलासा देतानाच जिल्ह्यातील सहा जणांचा बळी घेतला. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चांदवड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. नाशिक शहर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व निफाड तालुक्यांतील बळीराजा पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

नाशिक नजीकच्या देवळाली भागात पावसाने हजेरी लावली. मात्र शहरात पाऊस हुलकावणी देत आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले असून, त्यातच उद्योगनगरीत विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. दोन दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत होता. यामुळे आज जोरदार पाऊस होईल, अशी आशा होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरवात झाली.

पाऊण तासात रस्ते ओले करून पाऊस माघारी फिरला. जिल्ह्यात सोग्रस ते चिंचवे या महामार्गावर आजही पावसाने हजेरी लावली. चांदवडला सलग पाऊस सुरू आहे. नाशिक व परिसरात १५ जूननंतर मॉन्सून सक्रिय होईल, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. एरवी मुंबईमार्गे पाऊस हजेरी लावतो. या हंगामात पूर्वेकडून विदर्भ, मराठवाडा परिसरातून पावसाला सुरवात झाली. (latest marathi news)

अवर्षणप्रवण तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने वाफसा होताच पेरणीच्या कामांना गती मिळेल. कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून, बी-बियाणे व खतांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. काही प्रमाणात अनुदानित बियाणे पुरवठ्यात असलेल्या अडचणी दूर झाल्या असून, शुक्रवार सायंकाळपर्यंत सर्व तालुक्यांत अनुदानित बियाणे पुरवठा महाबीज व नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येईल, असे जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात १३ जून अखेरपर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये

मालेगाव- ७२ .६

बागलाण- ५३.२

कळवण- ३१.२

नांदगाव- ९४.३

सुरगाणा - ४८.९

नाशिक- ४०.७

दिंडोरी- ३९.६

इगतपुरी- ८१.१

पेठ- ३९ .०

निफाड- ६८.९

सिन्नर - ८४.६

येवला- ७२.८

चांदवड- १३६. ०

त्र्यंबकेश्वर- ५७.०

देवळाली- १०२.७

-----

नाशिक जिल्हा- ६८.५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

SCROLL FOR NEXT