Collected ponds in Acharya Udyan in Survey No. 911 of Jyeshtha Nagrik & Vasannagar while removing drainage ingress in front of Vista Society. esakal
नाशिक

Nashik Monsoon Rain : इंदिरानगर-पाथर्डी भागात ड्रेनेज ओव्हरफ्लो! संततधार पावसाने स्थिती अधिकच बिकट

Monsoon Rain Update : पावसाळी नाल्यांचे आणि इतर चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत आहे.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने इंदिरानगर- पाथर्डी फाटा भागातील उपनगरांमध्ये सखल भागात पाण्याचे तळी साचले आहेत. पावसाळी नाल्यांचे आणि इतर चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. (Monsoon heavy Rain Drainage overflow in Indiranagar Pathardi area)

इंदिरानगर येथील दुरवस्था झालेल्या सायकल ट्रॅकच्या कुंपणाची जाळी भिंतीसह कोसळली आहे. वडाळा गाव चौफुली ते मनोज गॅरेजदरम्यानची जाळी रस्त्यात आडवी झाली आहे. या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामात जाळी खाली असलेल्या पायाच्या भिंतीचा आधार गेल्यामुळे पावसाने भुसभुशीत झालेल्या जमिनीमुळे जाळी पडली आहे.

अशोका हॉस्पिटलसमोर असलेल्या विस्टा सोसायटीजवळ असणाऱ्या रो-हाउसमध्ये ड्रेनेजचे ओव्हरफ्लो झालेले पाणी शिरले. घरांच्या पोर्चमधून कॉलनी रस्त्यावर हे पाणी वाहत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिवसभर रस्त्यावर साचलेले हे पाणी चर खोदून बाहेर काढण्याची कसरत करावी लागली.

अशीच परिस्थिती श्रद्धा विहार, पांडवनगरी भागात असलेल्या पावसाळी नाल्यांच्या आसपास झाली होती. सराफनगर, वासननगर भागात देखील मोकळ्या भूखंडावर पाण्याची तळी साचली आहेत. सर्व्हे क्रमांक ९११ मधील वासननगरच्या आचार्य उद्यानात पाण्याचे तळे साचल्याने सायंकाळी येथे फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ महिला आणि पुरुषांची गैरसोय झाली आहे. (latest marathi news)

तीन दिवसांपूर्वीच स्थानिक माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी उद्यान विभागाचे श्री. परब आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथे साचत असलेल्या पाण्याबाबत उपाययोजना करण्याची चर्चा केली होती. मुरूम टाकणे आणि उद्यानात वाहून येणारे रस्त्यावरील पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते कधी होईल या प्रतीक्षेत नागरिक आहेत. गमने मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर देखील पाण्याची तळी साचली आहेत.

१८ जूनला पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाखालून सिडको आणि वासननगर बाजूचे सर्व्हिस रस्ते जोडण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. मात्र दीड महिन्यानंतरदेखील हे काम पूर्ण न झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या कच्च्या रस्त्याचा दुचाकीस्वार वापर करत आहेत.

त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पाथर्डी फाटा चौक ते टोयाटो शोरूमपर्यंत असलेल्या उड्डाणपुलाखालील जागेत भरमसाट झाडे वाढली आहेत. येथे मातीचे मोठे ढीग घालून ठेवण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे येथील स्थिती अधिकच बिकट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kankavli Politics : नीतेश राणेंविरोधात 'मविआ' कोणाला उतरविणार रिंगणात; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, 'ही' नावं चर्चेत

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्याच लोकांनी घेरले

Chutney Store Tips: घरी बनवलेल्या चटण्या दिर्घकाळ राहतील चांगल्या, फक्त 'या' टिप्स करा फॉलो

Aadhaar Update : आधार कार्डवरील ही माहिती कधीच बदलू नका; अपडेट करताना घ्या काळजी,नाहीतर होईल पश्चाताप

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, निफ्टी 24,500 च्या खाली

SCROLL FOR NEXT