Monsoon sakal
नाशिक

Nashik Monsoon : पावसाचा जोर जिल्ह्यात कमी

Nashik Monsoon : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी (ता. २८) पावसाने उघडीप दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी (ता. २८) पावसाने उघडीप दिली. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरातही दिवसभरात केवळ ०.८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. आठवडाभरात काही दिवस चांगला पाऊस झाला. ( Monsoon intensity of rain is less in district )

त्यामुळे अनेक धरणांची पातळी वाढण्यास मदत झाली. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणीचिंताही मिटली आहे. परंतु, दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा कमी झाला असून, काही तालुक्यांत तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पेठ तालुक्यात १६.७, त्र्यंबकेश्वरमध्ये १२.०, इगतपुरीत ११.६, सुरगाण्यात ८.५, दिंडोरीत ७.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चांदवडमध्ये १.७, कळवणमध्ये १.६, नाशिक तालुक्यात १.३, तर सिन्नरमध्ये १.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (latest marathi news)

जिल्ह्यात जुलैमध्ये १५ तालुक्यांमध्ये सरासरी १७४.४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे. १ ते २८ जुलै या कालावधीत २२९.१ मिलिमीटर पाऊस झाला. जुलैमधील सरासरीच्या ८२ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी चार तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली. दिंडोरीत १५८, येवल्यात १३३, चांदवड आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ११७.४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT