Maximum temperature 33 degrees Celsius esakal
नाशिक

Nashik News : पावसाने दिली ओढ; पाऱ्यात झाली वाढ, कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्‍या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असताना, मात्र शहरात पाऊस‍ ओढ देत आहे. यामुळे सातत्‍याने खालावणाऱ्या तापमानाच्या पाऱ्यामध्ये मंगळवारी (ता.११) वाढ नोंदविली गेली आहे. कमाल तापमानात तीन अंशांनी वाढ होऊन ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. (Maximum temperature 33 degrees Celsius)

उकाड्याने त्रस्‍त असलेल्‍या नागरिकांना पाऱ्यातील घसरणीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. उच्चांकी तापमान गाठल्‍यानंतर सातत्‍याने पारा घसरत होता. त्‍यातच जूनच्‍या सुरवातीस मॉन्‍सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्‍यानंतर वातावरणात गारवा जाणण्यास सुरवात झाली. रिमझिम पावसाच्या हजेरीने उष्मा कमी होण्यास मदत झालेली होती.

परंतु गेल्‍या दोन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी पावसाने मात्र दांडी मारली आहे. ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतेत वाढ होऊन उकाडा जाणवतो आहे. अवघ्या एका दिवसात पाऱ्यामध्ये तीन अंश सेल्सिअसने वाढ नोंदविली आहे. (latest marathi news)

सोमवारी (ता.१०) नाशिकचे कमाल तापमान ३०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असताना, मंगळवारी (ता.११) ते ३३ अंश सेल्सिअसवर पोचले. तर किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअसवरून साधारणतः दोन अंशांनी वाढून २३.९ अंश सेल्सिअसवर पोचले आहे.

रात्रीच्‍या वेळी वाऱ्याचा दिलासा

पाऱ्यात चढ-उतार सुरू असताना, वातावरणात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उकाड्याची तीव्रता कमी होण्यास सहाय्यता होते आहे. विशेषतः रात्रीच्‍या वेळी वाहत्‍या वाऱ्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळतो आहे. मध्यरात्री काही प्रमाणात गार हवा जाणवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

NIA Raid : ‘एनआयए’चे देशभर २२ ठिकाणी छापे; संशयास्पद साहित्य जप्त, राज्यामध्येही कारवाई

Narendra Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Rahul Gandhi : आरक्षण मर्यादा वाढवणारच! कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

Calcutta Crime : पश्चिम बंगाल पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

SCROLL FOR NEXT