Rain  esakal
नाशिक

Nashik Monsoon Rain: इगतपुरी अन सुरगाणा तालुक्यामध्ये गेल्या 24 तासात पावसाची मेहेरबानी!

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३०), शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता. २) मध्यम पावसाची शक्यता केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Rain : शहर व परिसरात आज संततधार पाऊस झाला. तसेच गेल्या चोवीस तासात इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात वरुणराजाने मेहेरबानी केली आहे.

इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे जिल्ह्यातील घाट भागामध्ये बुधवारी (ता. २८) आणि गुरुवारी (ता. २९) जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Nashik Monsoon Rain in Igatpuri and Surgana Taluka in last 24 hours)

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३०), शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता. २) मध्यम पावसाची शक्यता केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे. पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहणार असून तापमान कमाल २६ ते २९, तर किमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

वाऱ्याचा वेग तासाला २० ते २६ किलोमीटर राहणार आहे. पावसाचा अंदाज पाहता, पेरलेल्या रोपवाटिकेतील अधिकचे पाणी काढून टाकावे आणि आता पेरणी करणाऱ्यांनी रोपवाटिकेत अधिकचे पाणी काढण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये सुरगाण्यात २०.४, इगतपुरीमध्ये २५.७ मिलिमीटर, त्र्यंबकेश्‍वरमध्ये १३.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नाशिकमध्ये आज सकाळी आठपर्यंत ३.३ आणि सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत १०.७ मिलिमीटर पाऊस झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंडलनिहाय पावसाची स्थिती

काही मंडळांमध्ये गेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : दळवट-११.८, अभोणा-१४.५, उंबरठाण-३२, बाऱ्हे-१७, बोरगाव-१६.५, मनखेड-१२.५, सुरगाणा-२४, देवळाली-११.५, सातपूर-१०.५, शिंदे-१३, पाथर्डी-१५.५, ननाशी-१८.३, इगतपुरी-२३, घोटी-२३, वाडीवऱ्हे-३२, नांदगाव सदो-१९.८, टाकेद-१२.८, धारगाव-४३.८, पेठ-१८.८, जोगमोडी-११. दरम्यान, जिल्ह्यात गेल्यावर्षी जूनमध्ये ८६.२ टक्के पावसाची नोंद झाली होती.

यंदा आतापर्यंत २७.१ टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षीच्या जूनमधील पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-६१.३ (१७५.२), बागलाण-३०.२ (११७), कळवण-४८.२ (११८.६), नांदगाव-२६.८ (१५२.८), सुरगाणा-२२.८ (६९), नाशिक-१४.३ (६६.५), दिंडोरी-२४ (१११.१), इगतपुरी-१३.९ (२३.८), पेठ-२२.२ (६९.४), निफाड-४०.१ (१११.६), सिन्नर-२५.९ (११९.४), येवला-४४.९ (५७.८), चांदवड-२२.८ (२११.२), त्र्यंबकेश्‍वर-३२.२ (४४), देवळा-५५.९ (१५३.६).

जलसाठा २ टक्क्यांनी कमी

जिल्ह्यातील ७ मोठ्या आणि १७ मध्यम अशा २४ धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आता २ टक्क्यांनी जलसाठा कमी आहे. गेल्यावर्षी २३ टक्के जलसाठा होता, तर आता २१ टक्के जलसाठा आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक जलसाठा असलेल्या धरणांमधील सध्याच्या जलसाठ्याची टक्केवारी याप्रमाणे : गंगापूर-३०, करंजवण-१३, भावती-५, मुकणे-३६, वालदेवी-१९, भोजापूर-१२, चणकापूर-२७, हरणबारी-३५, केळझर-३३, पूनंद-३४.

राज्यात सर्वाधिक टँकर सुरू

राज्यात सर्वाधिक टँकर जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्ह्यातील ४६ गावे आणि ५२ वाड्यांना ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

गेल्या आठवड्यात सुद्धा हीच स्थिती होती. गेल्यावर्षी जूनच्या अखेरीस जिल्ह्यातील ८४ गावे आणि ८३ वाड्यांसाठी ६७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT