Gangapur dam esakal
नाशिक

Nashik Monsoon Rain Update : गंगापूर धरण 66 टक्के भरले, श्रावणात पाण्याचा विसर्ग! 78 टक्के भरल्यानंतर मराठवाड्यासाठी पाणी

Nashik News : हवामान विभागाने ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्याने या दोन महिन्यात गोदावरीला दोन ते तीन पुर येतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Rain Update : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६६ टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षासाठी जवळपास पाणीप्रश्‍न संपुष्टात आला आहे. आता ७८ टक्के धरण भरल्यानंतर जायकवाडीसाठी धरणाचे दरवाजे खुले होतील.

पावसाला दोन महिने शिल्लक राहिल्याने त्यातही हवामान विभागाने ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्याने या दोन महिन्यात गोदावरीला दोन ते तीन पुर येतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्या दृष्टीने गोदाकाठच्या दुकाने व घरांनादेखील सतर्क राहावे लागणार आहे. (Gangapur Dam 66 percent full)

नाशिक व नगरच्या धरणांतून मराठवाड्याकरिता गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून ८. ६ टीएमसी पाण्याचा विसर्ग केल्याने नाशिकवर यंदा पाणीटंचाईचे सावट होते. शहरासाठी ६,१०० दलघफू पाण्याची मागणी असताना, जलसंपदा विभागाने ५,३१४ दलघफू पाणी आरक्षित केल्याने ७८६ दशलक्ष घनफूट पाण्याची कपात केली.

त्यामुळे ३१ जुलैअखेर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १८ दिवसांची तूट असताना यंदा पावसाळा लांबला होता. त्यात धरणातील जलसाठा तळाला गेल्याने महापालिकेच्या पंपिग स्टेशनमधील जॅकवेलपर्यंत पाणी वाहून येण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या.

पाऊस लांबल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे काळे ढग घोंगावू लागल्यानंतर कश्यपी धरणातील सुमारे ३०० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणात सोडून नाशिककरांवरील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला. २२ जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने धरणाकडे येणारे नदी, नाले प्रवाहित झाले. (latest marathi news)

त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा हा ६७ टक्क्यावर पोचला असून, गंगापूर धरण समूहाचा साठा हा ५८.६८ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. गेल्या वेळी या तारखेपर्यंत समूहात ६६.७९ टक्के साठा होता. मागील वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी श्रावणात त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याची तूट भरून निघेल.

धरणांतील साठा दशलक्ष घनफूटात (टक्के)

गंगापूर-३६९५ (६५.६३)

मुकणे- २७८७ (३८.५०)

कश्‍यपी- ६०३ (३२.५६)

गौतमी गोदावरी- ११८९ (६३.६५)

दारणा- ६११३ (८५.५१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT