नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दोन ते तीन दिवस चांगल्या प्रकारे वरूण राजाने कृपा केल्यामुळे पश्चिम पट्ट्यातील सर्वच लहान-मोठे बंधारे भरल्यामुळे बुधवारपासून भोजापुर धरणात नद्यांद्वारे पाणी येण्यास सुरुवात झाली होती. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत भोजापुर धरण 35 टक्के इतके भरले. (Monsoon Rain Update Thirty five percent water storage in Bhojapur Dam)
शुक्रवारी पावसाने थोड्या फार प्रमाणात उघडपी घेतल्यामुळे नदीला येणाऱ्या पाण्यात थोडी घट झाल्यामुळे पाण्याचा वेग थोडासा मंदावला आहे. मात्र दोन ते तीन दिवसांमध्ये पाण्याचा पुरवठा माळुंगी नदी द्वारे सुरू राहिल्यास भोजापुर धरण निश्चितपणेओव्हरफ्लो होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.
भोजापूर धरणाची एकूण क्षमता 361 दशलक्ष घनफूट (एम. सेफ्टी) इतकी असून साधारणत: आज मितिला भोजापुर पस्तीस टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे, असेच म्हणावे लागेल. सध्याच्या स्थितीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला जरी असला तरी भोजपूर धरण भरल्यानंतर पाटाद्वारे जे पाणी सोडले जाते, ते नदी नाल्यांना चांगल्या प्रकारे वाहिल्यानंतर भोजापुर धरणावर अवलंबून असलेल्या गावांना आणि शेतकऱ्यांना या पाण्याचा निश्चितपणे फायदा होईल. (latest marathi news)
मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष फक्त भोजापुर धरण कधी भरेल याकडे लागले असून या भागातील अनेक शेतकरी भोजापुर धरणावरती पाणीसाठा किती आला आहे, हे बघण्यासाठी गर्दी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.