Due to heavy rainfall in the western belt of Igatpuri taluka and the catchment area of ​​the dams, the water in the Darna Dam is stagnating. esakal
नाशिक

Nashik Monsoon Update: भावली धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर; दारणा धरणातून विसर्ग सुरू

विजय पगारे

Nashik Monsoon Update : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्टयात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधारेसह संततधार सुरू असल्याने भावली धरण क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली, तर भावली, भाम, वाकी नद्या प्रवाहित झाल्याने दारणा धरणातही मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे.

आजमितीस भावली धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असून, दारणा धरणातूनही आजपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Nashik Monsoon Update Bhavli Dam on way to overflow Discharge from Darna Dam has started nashik)

नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस नसला तरी घाटमाथ्यावर व इगतपुरी परिसरात पावसाचे सातत्य असल्याने पश्चिम भागातील धरणे, नद्या यांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. भावली धरण आज ९० टक्के भरले आहे.

त्यामुळे आज किंवा उद्या धरण ओव्हरफलो होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम पट्यात झालेला पावसामुळे दारणा धरणही ७८ टक्के भरले आहे. त्यामुळे दारणा धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ दिसत आहे.

दरम्यान, नेहमीप्रमाणे दारणा धरण सरासरी ७५ टक्के भरल्यानंतर दारणा धरणातून विसर्ग सुरू करण्यात येतो. दारणा धरणात किमान ७५ टक्के जलसाठा झाल्यानंतर प्रथम नगर जिल्हा व त्यानंतर मराठवाडा विभागाकडे जायकवाडी धरणासाठी दारणातून विसर्ग करण्यात येतो.

सद्यःस्थितीत दारणा धरणात ७८ टक्के जलसाठा झाल्याने प्रथमच विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आज सकाळपासून दारणा धरणातून एक हजार ११० क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. धरणात जसजसा साठा वाढेल तसतसा विसर्गाचे प्रमाण वाढविले जाणार आहे. दरम्यान आजअखेर इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात ५१ टक्के जलसाठा झाला आहे.

आकडे बोलतात :

तालुक्यातील धरणातील रविवारचा जलसाठा असा :

दारणा : ७७.९४ टक्के

मुकणे : ५४.७० टक्के

वाकी : २०.७९ टक्के

भावली : ९०.३१ टक्के

भाम : ५१.३० टक्के

कडवा : ३६.३७ टक्के

वालदेवी : २३.६५ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT