Nashik News : वाढत्या तापमानामध्ये सर्वाधिक एनर्जी देणारे शरीराला सर्वाधिक उपयोगी असणारे जर कुठले पेय असेल तर ते उसाचा रस होय. क्वचितच असं कोणी असू शकेल का ज्याला उसाचा रस आवडत नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उसाच्या रसाचे प्रेमी आपल्याला सर्वत्र आढळतात. उसाच्या रसामुळे एनर्जी तर प्राप्त होते. याबरोबरच शारीरिक सुद्धा अनेक फायदे आहेत. ()
अलीकडच्या काळात ३१०२ या या जातीच्या उसाला रसासाठी अधिक मागणी होत आहे. उत्कृष्ट चव व रस निघण्याचे प्रमाण अधिक त्यामुळे नाशिक शहरात जवळपास सर्वच रस गुऱ्हाळांवर ३१०२ या जातीचा ऊस रसासाठी वापरला जात आहे. तसेच ग्रामीण भागात दर्जेदार उसाचे उत्पादन मिळवण्यासाठी या उसाच्या जातीची शिफारस अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात केली जात आहे. (latest marathi news)
ऊस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात अनेक बागायती भागात लागवड केली जाते. ३१०२ ऊस जातीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांबी जास्त आणि जाडीही जास्त आहे. तसेच उसाची ही जात चांगली रोगप्रतिकार क्षमता आहे. विशेष म्हणजे या जातीपासून एकरी ५०० ते ६०० क्विंटलपर्यंतचा उतारा मिळत असल्याचा दावा केला जातो.
''आजमितीस ३१०२ या उसाला रसासाठी जास्त मागणी आहे. रसाला येणारी उत्कृष्ट चव व रस अधिक प्रमाणात निघतो. त्यामुळे रस गुऱ्हाळ चालवणारे या उसाच्या जातीला अधिक प्राधान्य देतात. पूर्वी जालना या परिसरात या उसाचे उत्पादन होत असे. मात्र सध्या नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने निफाड तालुक्यातील उत्पादन घेतले जाते.''- दीपक शेवाळे, योगायोग ऊस व बांडी सप्लायर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.