सटाणा : धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलाण व मालेगाव तालुक्यासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास विभागाकडून दोन कोटी ४३ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Nashik MP Bhamre Tourism of Baglan Malegaon marathi news)
डॉ. भामरे म्हणाले, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळवून घेतला. या निधीमुळे समाविष्ट गावातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. त्याठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा व विकासकामे होणार आहेत. त्यामुळे या गावांतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना पर्यटनवाढीसाठी मदत होणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. (latest marathi news)
या गावांचा समावेश
बागलाण तालुक्यातील देवळाणे, बिजोटे, ढोलबारे, ताहाराबाद, तळवाडे दिगर, पठावे दिगर, नळकस, तिळवण, काकडगाव येथे सभामंडप बांधकामासाठी प्रत्येकी १० लाख, तर मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे शिवतीर्थ उद्यान सुशोभीकरण ३० लाख, मालेगाव कॅम्प महादेव मंदिर परिसरात प्लेव्हर ब्लॉक बसविणे ५० लाख, वडगाव येथे पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील सभामंडप व इतर अनुषंगिक कामांसाठी ६३ लाख याप्रमाणे दोन कोटी ४३ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.