MP Rajabhau Waje esakal
नाशिक

Nashik News : शेतकऱ्यांचा सीबील स्कोअर बघू नका : राजाभाऊ वाजे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या व्यक्तींनाच पीककर्ज देण्याचा राष्ट्रीयीकृत बँकांचा कल राहिला आहे. परंतु थकीत कर्जदारांची कारणे जाणून घेऊन त्यांच्यासह शेतकऱ्यांचा सीबील स्कोर न बघता त्यांनाही पीककर्ज वाटपाच्या सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंगळवारी (ता. ९) येथे केल्या. (MP Rajabhau Waje Collector Jalaj Sharma held quarterly review meeting of banks)

खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांची तिमाही आढावा बैठक घेतली. आर्थिक विकास महामंडळांच्या विविध योजना, बँकांमार्फत होणाऱ्या कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. या वेळी खासदार वाजे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

ते म्हणाले, पीककर्ज देताना बँक नियमित कर्जदारांना प्राधान्य देतात. त्यांना कर्ज मिळालेच पाहिजे. परंतु, काही कारणास्तव शेतकरी थकीत कर्जदार झाले आहेत. शेतकऱ्यांचा सीबील स्कोअर न बघता त्यांनाही पीककर्ज दिले पाहिजे. शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. महिला बचतगटांना अर्थसहाय करताना जाचक अटी लावू नका.

बँकांची ही पहिलीच बैठक असून, पुढील तीन महिन्यांनी होणाऱ्या बैठकीत आत्ता दिलेल्या सूचनांचा पुन्हा आढावा घेण्यात येईल. ज्या बँका व्यवस्थितपणे काम करणार नाहीत त्यांची वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्याचा इशाराही खासदारांनी दिला. जिल्हाधिकारी शर्मा यांनीही बँक अधिकाऱ्यांना नियमितपणे तालुकास्तरीय बैठकांना उपस्थित राहण्याची सूचना केली. (latest marathi news)

या वेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सी. बी. सिंग, व्यवस्थापक भिवा लवाटे, नाबार्डचे अमोल लोहकरे, गणेश सरोदे यांसह बँक अधिकारी व विविध महामंडळाचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेची आघाडी

पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमी अग्रेसर राहाते. यंदा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी लक्ष्यांक कमी करून घेतले. या तुलनेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आघाडी घेतलेली दिसून येते. या बँकेला १३२ कोटींचा लक्ष्यांक असताना त्यांनी १३३ कोटींचे (१०१ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. या तुलनेत पंजाब ॲन्ड सिंध बँकेने अवघे एक टक्के पीककर्ज वाटप केल्याचे दिसून येते.

बँकनिहाय कर्जवाटप (लाखांत)

बँक .................... लक्ष्यांक..............वाटप (रु.)

जिल्हा बँक ….....५९,६३६............३९,७८० (६६.७ टक्के)

राष्ट्रीयीकृत बँक.....२,०६,४०१.......८३,७४५ (४०.६ टक्के)

ग्रामीण बँक.......१,३२०...............१,३३५ (१०१.१ टक्के)

खासगी बॅंका......६०,११०............१८,२१३ (३०.३ टक्के)

एकूण.....तीन हजार २७४ कोटी ६७ हजार....एक हजार ४३० कोटी ७४ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT