सिन्नर : खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ‘गोदा काठावर बसून नाशिकची सेवा करेल’ असा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संपर्क कार्यालय सुरु करुन खा. वाजे आता जनतेच्या थेट संपर्कात राहणार आहेत. शालिमार चौकातील बी.डी. भालेकर मैदानाजवळील महाकवी कालिदास कलामंदिरच्या बाजूला 'बलसरा हाऊस' हे संपर्क कार्यालय असून खा. वाजे दुपारी १२ ते सायं. ५ वाजेपर्यंत जनसामन्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. (MP Rajabhau Waje now in direct contact)
नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही लोकवस्तीचा भाग आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील आदिवासी भाग, नाशिक तालुका आणि इतर ग्रामीण भागातील नागरिक असो की नाशिक शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील रहिवासी असो, त्यांना खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी थेट संपर्क साधणे सोपे व्हावे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जनसामन्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी खा. वाजे यांच्या संपर्क कार्यालयातून विशेष कामकाज केले जाणार आहे.
योजनांच्या बाबतीत येणाऱ्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय सकाळी १० ते सायं ६ वाजेपर्यंत सज्ज असेल असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, आपली कोणतीही समस्या किंवा काम असल्यास 'बलसरा हाऊस' या कार्यालयात अथवा ०२५३ २९९७७७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खा. वाजे यांनी केले आहे. (latest marathi news)
आरोग्य सेवेसाठी विशेष केंद्र
खा. वाजे यांच्या नाशिक कार्यालयात लवकरच आरोग्यविषयक मदतीसाठी एक विशेष केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मागील काही महिन्यात खा. वाजे यांच्या माध्यमातून पंतप्रधान केअरतर्फे लाखो रुपयांची मदत आतापर्यंत रुग्णांना मिळवून देण्यात आली आहे. आगामी काळात याची व्याप्ती वाढवण्याचा खा. वाजे यांचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.