Speaking at a meeting at Shiv Sena Public Relations Office, MP Rajabhau Waje, Shiv Sainik officials on the platform esakal
नाशिक

Assembly Election : इच्छुकांनो, विधानसभेच्या तयारीला लागा : खासदार वाजे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न प्रत्येक शिवसैनिकाचे आहे, त्यासाठी विधानसभेचा आमदार शिवसेनेचा व्हावा यासाठी विधानसभेसाठी आतापासून तयारी लागणे गरजेचे असून जे कोणी इच्छुक असतील त्यांनी पक्षाकडे नावे द्यावीत. असे आवाहन शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. (MP Wage statement Aspirants get ready for Assembly election)

सिन्नरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालयात आज मंगळवारी खासदार वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद नागावकर, उपजिल्हा प्रमुख कन्हूभाऊ ताजने, राजेश गडाख, भारत कोकाटे, बाळासाहेब वाघ, अरुण वाघ, डॉ. रवींद्र पवार, शशिकांत गाडे, संजय सानप उपस्थित होते. (latest marathi news)

सिन्नर पॅटर्न राज्यात चर्चेत

खासदार वाजे म्हणाले की, इच्छुक नावांचा पक्षाकडून सर्व्हेक्षण करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उमेदवारीचा निर्णय घेतली. पक्ष जो आदेश देईल त्या प्रमाणे त्या उमेदवारास निवडून आणण्याचे काम आपण सर्व मिळून करू. मागील विधानसभेत अल्प मताने शिवसेनेचा आमदार होऊ शकला नाही.

मात्र, यावेळी निश्चितच उद्धव ठाकरे यांच्या विचाराचा आमदार सिन्नर विधानसभेचा असेल. सिन्नरकरांनी लोकसभेची निवडणूक हाती घेतली होती व स्वतः उमेदवार आहे या आविर्भावात काम केल्याने माझा विजय निश्चित झाला. हा सिन्नर तालुक्याचा निवडणुकीचा पॅटर्न विधानसभेत दिसावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT