People of Mahavitaran doing pre-monsoon maintenance and repair work in the city. esakal
नाशिक

MSEB News : मान्सूनपूर्व कामांना महावितरणतर्फे सुरवात; झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या

सकाळ वृत्तसेवा

MSEB News : दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनापूर्वी विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये केली जाते. याच पाश्‌र्वभूमीवर विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्तीच्या कामांना महावितरणातर्फे सुरवात करण्यात आली आहे. नाशिक परिमंडळात अभियंते, जनमित्र व बाह्यस्त्रोत कामगारांच्या माध्यमातून ही कामे सुरू झाली आहे. ( MSEB Pre monsoon work started by Mahavitaran )

पावसाळ्यामध्ये ग्राहकांना अखंडित वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जात असल्याने ग्राहकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले. महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक कारणांमुळे यंत्रणेमध्ये व्यत्यय येत असतो. पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ वीज पुरवठा बंद राहू नये म्हणून पावसाळापूर्वी या कामांना सुरवात झाली आहे. (Latest Marathi News)

यामध्ये विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांचे ऑइल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली करणे, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल तसेच उपकेंद्रातील सर्व यंत्रांची तपासणी केली जात आहे.

महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सर्व अभियंते व कर्मचारी यांना उपाययोजना व सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. सोबतच ही कामे करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते. तरी ग्राहकांनी संयम बाळगावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT