Shukshukat at the railway station here. esakal
नाशिक

Mega Block : मुंबईतील जम्बो मेगाब्लॉकमुळे मनमाड स्थानकावर शुकशुकाट; तपोवन, राज्यराणीसह पंचवटी एक्स्प्रेस रद्द

Mega Block : मध्य रेल्वेतर्फे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व ठाणे येथे घेण्यात आलेल्या ६३ तासांच्या जम्बो मेगाब्लॉकला शनिवार (ता. १) पासून प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

Mega Block : मध्य रेल्वेतर्फे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व ठाणे येथे घेण्यात आलेल्या ६३ तासांच्या जम्बो मेगाब्लॉकला शनिवार (ता. १) पासून प्रारंभ झाला. मध्यरात्री सुरू झालेल्या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या जवळपास आठ रेल्वे गाड्या शनिवारी रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रासह मनमाड व नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांशी निगडित तपोवन, राज्यराणी, पंचवटी आणि धुळे-मनमाड-मुंबई या गाड्यांचा समावेश असल्याने या भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. (nashik Mumbai mega block cause chaos at Manmad station )

दरम्यान, मेगाब्लॉकच्या पार्श्‍वभूमीवर मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी शुकशुकाट होता. येथील रेल्वे स्थानकातील तिकीट बुकिंग आरक्षण खिडकीसह फलाटांवर प्रवाशांची तुरळक गर्दी दिसून येत होती. छत्रपती संभाजीनगर अर्थात, मराठवाड्याकडून येणाऱ्या आणि दौंड-पुणेमार्गे धावणाऱ्या आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक मात्र पूर्ववत होते. परंतु, या जम्बो ब्लॉकबरोबरच उत्तर भारतातून मुंबईला जाणाऱ्या अनेक प्रवासी गाड्या पाच ते दहा तासांच्या विलंबाने धावत होत्या.

मात्र, कुर्ला जंक्शन रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या काहीशा विलंबाने पण धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना थोडा आधार झाला. दरम्यान, शनिवारी मनमाड रेल्वे स्थानकातून गोरखपूर-कुर्ला एक्स्प्रेस तीन तास, भागलपूर - कुर्ला एक्सप्रेस एक तास, अमृतसर - नांदेड सचखंड एक्स्प्रेस आठ तास, जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस सात तास, तर मुजफ्फरपुर-हुबळी ग्रीष्मकालीन एक्स्प्रेस पाच तासाच्या विलंबाने धावत होत्या. (latest marathi news)

शनिवारी रद्द केलेल्या गाड्या

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, साईनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई- मनमाड-धुळे, मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, धुळे-मुंबई-धुळे-मनमाड एक्सप्रेस, हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस आणि जबलपूर- मुंबई गरीब रथ.

रविवारी रद्द झालेल्या गाड्या

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, मुंबई-साईनगर वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-धुळे एक्स्प्रेस, मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, धुळे-मनमाड-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई- जालना वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-जबलपूर गरीब रथ आणि मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT