A revised message board on the back wall of the Mahatma Jyotirao Phule and Krantijyoti Savitribai Phule memorial at Mumbai Naka Circle. esakal
नाशिक

Nashik News : महात्मा फुलेंचा संदेश ‘अखंड’! भाकपच्या मागणीनंतर प्रशासनाकडून दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई नाका सर्कलवर उभारलेल्या महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या पाठीमागील भिंतीवर लावलेल्या संदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अखंडात चूक झाल्याचा आक्षेप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतला होता. (Phule statue message Amendment by administration after demand of CPI)

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या अखंडात ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले’ या ओळी आहेत. मात्र स्मारकाच्या पाठीमागील भिंतीवर हा संदेश लिहिताना यातून ‘वित्ताविना शूद्र खचले’ या ओळी वगळल्याचा आक्षेप भाकपचे शहर सचिव तल्हा शेख, राजू देसले यांनी घेतला होता. या विषयी सोमवारी (ता.३०) त्यांनी महापालिका प्रशासनाची भेट घेत अखंड दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करत भिंतीवर सुधारित संदेशाचा फलक लावला आहे. (latest marathi news)

मनसेकडून कोनशिलेसाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम

महापालिकेत मनसेची सत्ता असताना जुने पंपिंग स्टेशन रोडवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्रसंग्रहालयाची उभारणी करण्यात आली. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संग्रहालयाला उतरती कळा लागली. प्रकल्प बंद पडला. शिवकालीन शस्रे पुन्हा मागविण्यात आली. त्यानंतर राज्यातील महायुतीच्या सत्तेतील शिवसेनेच्या शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

स्मृती उद्यानाचे लोकार्पण करताना राज ठाकरे यांच्या नावाने पूर्वी असलेली कोनशिला काढून टाकल्याने मनसेने ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मनपाच्या बांधकाम विभागाने तीन दिवसांत कोनशिला बसविण्याचे आश्‍वासन दिले. मात्र अद्यापही कोनशिला बसविलेली नाही. त्यामुळे मनसेने पुन्हा दोन दिवसांचा अल्टिमेटम महापालिकेला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे नऊ महिन्यांचे पैसे मिळणार; बारामतीमध्ये अजित पवारांची माहिती

Jawan Found After 56 Years: 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान

Ajit Pawar: ''तुम्हाला आता हसणारा अजित पवार दिसतोय ना..?'' बारामतीमध्ये अजित पवारांनी सांगितलं नव्या बदलाचं कारण

Harshwardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचा इरादा पक्का! अंकिता पाटलांनी बदललं स्टेट्स; उद्या पत्रकार परिषदेत घोषणा?

Shiv Chhatrapati Award 2022-23 : अविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित; प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कार

SCROLL FOR NEXT