Onion  esakal
नाशिक

Nashik News : मुंगसे बाजार समिती अखेर सुरु; पहिल्याच दिवशी 15 हजार क्विंटल कांद्याची आवक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : व्यापारी व माथाडी कामगारांमधील लेव्हीच्या वादामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असलेला येथील बाजार समितीचा मुंगसे कांदा उपबाजार गुरुवारी (ता. २) सुरु झाला. बाजार सुरु होताच पहिल्याच दिवशी १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. केवळ एका ट्रॅक्टरला १ हजार ८०१ रुपये क्विंटल भाव मिळाला. (Mungse Bazaar Committee finally started)

बहुतांशी कांदा १२०० ते १४०० रुपये क्विंटलने विकला गेला. दुय्यम प्रतीचा कांदा ९०० ते १२०० रुपये तर सर्वसाधारण कांद्याची ४०० ते ८०० रुपये दराने विक्री झाली. दरम्यान शुक्रवारी (ता. ३) व्यापाऱ्यांचा लाक्षणीक संप व शनिवार, रविवारची नियमित सुटी असल्याने तीन दिवस पुन्हा बाजार बंद राहणार आहे.

लेव्हीच्या मुद्यावर व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्ष महिन्यापासून सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात २१ एप्रिलला बाजार सुरु झाला होता. पुन्हा वाद निर्माण झाल्याने लिलाव बंद झाले. बाजार समिती पदाधिकारी, व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये २९ एप्रिलला झालेल्या बैठकीनंतर बाजार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्यापाऱ्यांनी हमाली, मापाई व वाराई कपात न करता लिलाव करण्याची भूमिका घेतली. तर माथाडी कामगारांनी जोपर्यंत पुढचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाजात भाग घेणार नाहीत. मात्र कामावर असल्याची स्वाक्षरी हजेरी पुस्तकात घ्यावी अशी अट ठेवण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ती मान्य केल्याने ३० एप्रिलला येथील बाजार समितीच्या मुख्य आवारातील मका, धान्य व कडधान्याचे लिलाव झाले. (Latest Marathi News)

मुंगसे कांदा बाजार मात्र आजपासून सुरु झाला. सकाळ व दुपार या दोन्ही सत्रात लिलावाचे कामकाज झाले. व्यापाऱ्यांनी हमाली, मापाई व तोलाई कपात न करता लिलाव केले. केंद्र शासनाने ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भाव वाढतील अशी शक्यता होती. प्रत्यक्षात केवळ एका ट्रॅक्टरला १८०१ रुपये भाव मिळाला. उर्वरित कांदा हजार ते पंधराशे रुपये दरम्यान विकला गेला. अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

आज कामबंद आंदोलन

पिंपळगाव येथे माथाडी कामगारांनी व्यापाऱ्यांना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ३) लिलावाचे कामकाज बंद असेल. शनिवार व रविवार नियमित सुटी असल्याने कांदा बाजार ६ मेस सुरु होईल. येथील समितीच्या मुख्य आवारातील मका, धान्य व कडधान्याचे लिलाव शनिवारी (ता. ४) नियमितपणे होणार असल्याचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भिका कोतकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT