Nashik Municipal Commissioner : महापालिकेच्या ४६ व्या आयुक्त पदाची सूत्रे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासन डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे आली आहे. पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना महापालिका संदर्भातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
महापालिकेची कामकाजाची विस्कटलेली घडी दुरुस्त करण्याबरोबरच शासनाकडून विकासकामांसाठी निधी आणून महापालिकेच्या स्वउत्पन्नात वाढ करण्याचे तगडे आव्हान आहे. ( Nashik Municipal Commissioner Dr Ashok Karanjkar have many challenges to be faced in municipal context news)
दायित्वाचा भार कमी करणे, रस्ते तसेच अन्य कामांच्या गुणवत्तेत वाढ करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा असून त्या पार्श्वभूमीवर नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी राहील, अर्थात तोपर्यंत ते आयुक्त पदावर कायम राहणे आवश्यक आहे. महापालिका संदर्भातील गटर-वॉटर- मीटर व्यतिरिक्त विकासाच्या अनुषंगानेदेखील लक्ष घालावे लागणार आहे.
त्यात नमामि गोदा प्रकल्प, मेट्रो निओ प्रकल्प, नैसर्गिक गॅस पाइपलाइन, मल्टी मोडल ट्रान्स्पोर्ट हब, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क या प्रकल्पांना गती देणे आवश्यक राहणार आहे. महापालिकेला रिक्त पदे तसेच शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शासनाकडे प्रलंबित पदांचा आकृतिबंध मंजूर करणे भविष्याच्या दृष्टीने आव्हानाचे आहे.
ही आहेत आव्हाने
- नवीन पदांचा आकृतिबंध मंजूर करणे.
- गावठाण विकासासाठी चार एफएसआय मिळविणे.
- शहराला वाढीव पाणी आरक्षण मंजूर करणे.
- प्रलंबित पाणीपुरवठा व मलनिस्सारण आराखडा मंजूर करणे.
- स्वच्छ सर्वेक्षणात घसरलेली क्रमवारी वर आणणे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहर बससेवेचा तोटा कमी करणे.
- गोदावरी स्वच्छता, नमामि गोदा प्रकल्प मार्गी लावणे.
- सिन्नर फाटा येथे मोडल ट्रान्स्पोर्ट हबची निर्मिती
- अतिक्रमण हटविणे व पार्किंग सुविधा निर्माण करणे.
- बिटको रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणक्रम सुरू करणे.
- मीसिंग रस्ते तयार करणे.
- नवीन नगरामध्ये पाणी, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था करणे.
- वाहतूक आराखडा अंमलबजावणी करणे.
- वादग्रस्त पदोन्नती रद्द करून अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देणे.
वादग्रस्त मुद्दे
- घंटागाडी व पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची कोटीच्या कोटी उड्डाणे रोखणे.
- पीटीसी समोरच्या जागा महापालिकेच्या दफ्तरी नोंदविणे.
- देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक २९५ मधील टीडीआर घोटाळा.
- ४७७ उद्यानांची देखभाल व दुरुस्तीच्या चुकीचे बिले थांबविणे.
- स्मार्टसिटीच्या चुकीच्या कामांना ब्रेक लावणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.