नाशिक : आडगाव व म्हसरुळ या दोन महत्त्वाच्या गावठाणांचा मिळून अस्तित्वात आलेल्या या प्रभागात प्रस्थापितांचे सत्ताकारण झिडकारण्याची प्रथा मागील दहा वर्षांपासून पडली आहे. त्यामुळे यंदाही हाच कित्ता गिरविला जाणार असला तरी एकूण मतदारांच्या ६० टक्के मतदार असलेल्या आडगावकरावरच पालकत्व कोणाला द्यायचे याची भिस्त अवलंबून राहील. आडगावकरांच्या मनाचा ठाव घेणारा उमेदवार येथे विजयी होईल. मात्र, म्हसरुळ या अनुसूचित जमातीबहुल गटातील एक उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रीत राजकारण येथे फलद्रुप ठरेल.
पूर्वी म्हसरुळ हा भाग प्रभाग दोनला जोडला गेला होता, तर आडगाव स्वतंत्र प्रभाग होता. परंतु व्याप्ती नांदूर-मानूरपर्यंत जोडली गेली. २०१२ पर्यंत येथे प्रस्थापितांचे सत्ताकारण होते, त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. प्रस्थापितांना विस्थापितांनी धक्का दिला. आडगाव लगतच्या कोणार्कनगर, बिडी कामगारनगर या सारख्या महत्त्वाच्या नगरांनी आडगावच्या प्रस्थापितांच्या राजकारणाला सुरुंग लावला. यंदा म्हसरुळ व आडगाव हा भाग एकमेकांना का जोडला हे सर्वसामान्य मतदारांच्या पचनी पडत नाही. प्रभाग दोनमधील भाजपच्या प्रस्थापित उमेदवार यामुळे अधिक सुरक्षित झाले. त्यासाठी द्राविडी प्राणायाम असावा, असा संशय आहे. आडगाव- म्हसरूळ प्रभागाची रचना करताना महामार्गाची हद्द ओलांडल्याने नैसर्गिक हद्दी बदलण्याच्या नियमांची तोडफोड करण्यात आली.
परंतु , अद्याप या मोडतोडीबद्दल फारशा कोणाच्या तक्रारी नाहीत. एक आदिवासी एक जनरल पुरुष व एक जनरल महिला हे सूत्र येथे नक्की आहे. विद्यमान नगरसेवकांनी काय कामे केली हा प्रश्न येथे येणार नाही. त्याला कारण प्रथमच आडगाव- म्हसरूळ ही भौगोलिकदृष्ट्या विरुद्ध असलेली दोन टोके जोडली गेली आहे. आडगाव व म्हसरुळ गावठाण व कोणार्कनगर हे प्रमुख मतदानावर प्रभाग टाकणारे भाग आहे. ६० टक्के मतदान आडगावचे, २५ टक्के मतदान कोणार्कनगरसह नवनगरांचे तर पंधरा टक्के मतदान म्हसरूळचे आहे. त्यामुळे आडगावकरांची मने जिंकणारा बाजीगर ठरेल.
हे आहेत इच्छुक
भाजप - प्रियांका माने, धनंजय माने, शीतल माळोदे, गणेश माळोदे, नामदेव शिंदे, विलास शिंदे, कैलास शिंदे, विद्या शिंदे
शिवसेना : सुनील जाधव, मल्हारी मते, संदीप लभडे, बाळासाहेब उखाडे, विनोद हटकर, गणेश चव्हाण
मनसे : सोमनाथ वडजे, विश्वास तांबे
राष्ट्रवादी काँग्रेस : राम जाधव
काँग्रेस : विश्वास मोराडे
घडलंय-बिघडलंय- प्रभाग तीन
प्रभागाची व्याप्ती-
म्हसरूळ गावठाण व मळे परिसर, वैदुवाडी, गजपंथ सोसायटी परिसर, आडगाव गावठाण व मळे परिसर, मेडिकल कॉलेज, एमईटी कॉलेज, कोणार्कनगर, जत्रा हॉटेल परिसर, निशांत व्हिलेज, सागर व्हिलेज परिसर शरयू पार्क, ग्रामीण पोलिस वसाहत.
उत्तर :- दिंडोरी रोड महापालिका हद्दीवरील म्हसरुळ स. न. ३४ पासून, पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनपर्यंत तेथून महापालिका हद्दीने, महापालिका हद्दीवरील आडगाव गट क्रं. १७, ९, ४ पर्यंत.
पूर्व :- महापालिका हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन दक्षिणेकडे जाऊन औंरगाबाद रोड स.न. २२८३ पर्यंत.
दक्षिण :- औंरगाबाद रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील भाग घेऊन आडगाव गट नं २७७ पर्यंतच्या रस्त्याने उत्तरेकडे डावा तट कालव्यापर्यंत तेथून पुढे अंतर्गत रस्त्याने नांदूर जत्रा रस्त्यापर्यंत, जत्राअंतर्गत कॉलनी रस्त्याने कॉलनी रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन
१८ मिटर डीपी रस्त्यापर्यंत. पुढे पूर्वेकडील भाग घेऊन मुंबई आग्रा महामार्गाने रासबिहारी रस्त्यापर्यंत. पुढे रासबिहारी रस्त्याने औदुंबर लॉन्सपर्यंत पुढे उत्तरेकडे जाऊन वाघाडी नदीने १८ मिटर डीपी रोडपर्यंत. पुढे अंतर्गत कॉलनी रस्त्याने राज पॅलेस दिंडोरी रोडपर्यंत.
पश्चिम-दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपासमोरील राज पॅलेस पासून उत्तरेकडे जाऊन पूर्वेकडील भाग घेऊन दिंडोरी रत्याने महापालिका हद्दीवरील म्हसरुळ सर्व्हे क्रमांक ३४ पर्यंत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.