nashik municipal corporation election ward number 14  sakal
नाशिक

नाशिक महापालिका - समोरासमोर लढत होणार नाही याचीच काळजी

दिग्गजांची व्यूहरचना; पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेचे एकूण सहा विभाग असून, प्रत्येक विभागात लोकप्रतिनिधींचे स्वतःचे वर्चस्व आहे. प्रारूप प्रभाग रचनेतील या नव्या प्रभागात सातपूर विभागातील जवळपास सर्वच दिग्गज लढणार आहेत. परंतु, यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच दिग्गज एकमेकांसमोर येणार नाही अशी व्यूहरचना आखत असले तरी दोन, तीन नगरसेवक एकमेकांसमोर येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पश्‍चिम विधानसभा मतदारसंघावर निवडून येणाऱ्यांचा कायम प्रभाव असतो. त्यामुळे पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रीत निवडणुकीला या भागात महत्त्व येते.

सातपूर विभागात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा प्रभाग आहे. सातपूर गाव, सातपूर कॉलनी, तसेच काही गावे व औद्योगिक वसाहत असा मिश्रित भाग आहे. या भागातून निवडून येण्यासाठी दिग्गज लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतात. येथेही स्थानिक-उपरा वादाला खतपाणी घातले जाते. जात-धर्माच्या राजकारणाला येथे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात फुंकर घातली जाते. विकासापेक्षा जाती- पातीच्या राजकारणालाच महत्त्व दिले जाते. विकास करण्यास या भागात वाव नाही. रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज या सुविधा देणे आहेच. त्याव्यतिरिक्त अन्य कामे करण्यास वाव नसल्याने अन्य बाबींकडे मतदारांचे लक्ष वळविले जाते. गेल्या काही वर्षांत पारंपरिक मतदार हा भाग सोडून अन्यत्र वास्तव्याला गेल्याने हा मुद्दा निवडणुकीचे वारे फिरविण्यास परिणामकारक ठरू शकतो. त्यामुळे सातपूर भागातील नागरिकांचे या प्रभागातील निवडणुकीकडे लक्ष राहणार आहे.

प्रभागाची व्याप्ती

सातपूर कॉलनी परिसर, एमआयडीसी परिसर, सातपूर गाव, पिंपळगाव बहुला सर्वे क्रमांक १४५ च्या पश्चिम हद्दीपासून उत्तरेकडे महापालिका हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन गंगापूर पिंपळगाव बहुला शिवेपर्यंत. सातपूर गाव भाग, जाधव संकुल समतानगर, पपया नर्सरी, निलकंठेश्वर नगर, सातपूर कॉलनी.

  • उत्तर : संत नरहरी मार्गावरील महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या एमआयडीसीच्या दक्षिण हद्दीने दक्षिणेकडील भाग घेऊन इच्छापूर्ती साईनाथ मंदिरापासून आनंद छाया बसस्टॉपपर्यंत. पुढे छत्रपती शिवाजी विद्यालयापर्यंत. उत्तरेकडे सातपूर कॉलनीपर्यंत. पुढे त्र्यंबक रोडने डॉ. आंबेडकर हॉलपर्यंत.

  • पूर्व : त्र्यंबक रोडवरील डॉ. आंबेडकर हॉलपासून दक्षिणेकडे जाऊन अंतर्गत रस्त्याने नंदिनी नदीपर्यंत.

  • दक्षिण : नंदिनी नदीच्या डाव्या तिराने पश्चिमेकडे सातपूर- त्र्यंबक लिंक रोडवरील पुलापर्यंत, उत्तरेकडे त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी चौकापर्यंत, पश्चिमेकडे त्र्यंबकेश्वर रस्त्याने हॉटेल अमृत गार्डन समोरील विठ्ठल मंदिरापर्यंत.

  • पश्चिम : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील विठ्ठल मंदिरापासून नाल्याच्या हद्दीने पूर्वेकडील भाग, समृद्धीनगर घेऊन संत नरहरी मार्गापर्यंत तेथून उत्तरेकडे प्रगती हायस्कूल व लगतच्या परिसर घेऊन पूर्वेकडील भाग घेऊन महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनी हद्दीपर्यंत.

हे आहेत इच्छुक

शशिकांत जाधव, सीमा निगळ, सलीम शेख, वृषाली सोनवणे, रवी देवरे, समाधान देवरे, चारुदत्त आहेर, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, राहुल साळुंखे, लोकेश गवळी, योगेश गांगुर्डे, नीलेश भंदुरे, सुनील मौले, बाळासाहेब जाधव, विजय तुपलोंढे, किशोर निकम, शांताराम कुटे, आशा भदुरे, सुजाता भाबेरे, दत्तू वामन, नंदू जाधव, मधुकर जाधव, रेखा जाधव, श्‍वेता भदुरे, प्रकाश लोढे, दिक्षा लोंढे, दीपक लोढे, जगदीश काळे, परशुराम साठे, अर्चना साठे, सारिका दराडे, राजेश दराडे, संतोष नेर, गौरव बोडके, ताराबाई राऊत, रवींद्र जोशी, रामहरी संभेराव, योगेश गांगुर्डे, योगेश आहेर, बाळा निगळ, रूपाली गांगुर्डे, विजय आहिरे, फरीदा शेख, बजरंग शिंदे, ज्योती शिंदे, अमर शेवकर, सचिन घाटोळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT