Nashik Sites of proposed work in Simhastha Development Plan inspection by Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar. esakal
नाशिक

Nashik NMC : निवडणुका संपताच महापालिकेचा ॲक्शन मोड; सिंहस्थ कामांची आयुक्तांकडून पाहणी

Nashik News : लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता दोन दिवसापूर्वी संपुष्टात आली. त्यामुळे आगामी संस्थांच्या दृष्टीने महापालिका ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीचा प्रभाव संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू केली. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्तांनी गुरुवारी (ता. ६) कुंभमेळ्याच्या स्थानाची पाहणी करून आवश्‍यक त्या सूचना केल्या. यामध्ये शाही मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासह लक्ष्मी नारायण व टाळकुटेश्वर मंदिराजवळ पर्यायी पूल उभारण्यासाठी चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या. (Inspection of kumbh mela Works by Commissioner)

लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता दोन दिवसापूर्वी संपुष्टात आली. त्यामुळे आगामी संस्थांच्या दृष्टीने महापालिका ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसले. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी गंगाघाट व तपोवन परिसराची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल.

कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड, अग्निशमन अधिकारी संजय बैरागी आदी या वेळी उपस्थित होते. रामकुंड व लक्ष्मण कुंड येथील छोट्या पुलांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासून मजबुतीकरण करता येईल का.

त्याचप्रमाणे सांडव्याच्या देवी मंदिरासमोरील महापालिकेची इमारत सिंहस्थ निमित्त वापरात येईल का याबद्दल अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. सिंहस्थाच्या निमित्ताने प्रास्तावित करण्यात आलेले पूल, नदी घाट, कपिला गोदावरी संगम लक्ष्मण झुला, भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा विषयक कामे, साधूग्राम पाणीपुरवठा व विद्युत विषय कामे, तपोवनातील बस डेपो व रस्ते, मलजल शुद्धीकरण केंद्रांची पाहणी करण्यात आली. (latest marathi news)

गाडगे महाराज पुलाचे नूतनीकरण

सिंहस्थ कालावधीमध्ये पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक काढली जाते. तसेच दरवर्षी रामरथ व गरुडरथ गाडगे महाराज पुलाखालून जातात. रथ मिरवणुकीसाठी पुलाखाली खड्डा ठेवल्याने विद्रूपीकरण होते. त्यामुळे गाडगे महाराज पुलाचे मजबुतीकरण व नूतनीकरण केले जाणार आहे. पुलावरून रॅम्प उतरविण्यासंदर्भात चाचपणी करण्यात येणार आहे. टाळकुटेश्वर पुलालगत नवीन पूल उभारण्याच्या दृष्टीने क्षेत्र भूसंपादन करावे लागणार असल्याने त्या संदर्भात माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.

भाजी मार्केटमध्ये सुविधा केंद्र

गणेशवाडी येथे महापालिकेने भाजी मार्केट उभारले आहे. मात्र या भाजी मार्केटचा अद्यापपर्यंत एकदाही उपयोग झाला नाही. त्यामुळे नवीन भाजी मार्केटच्या वर एक मजला चढवून सिंहस्थ सुविधा केंद्र उभारले जाणार आहे. तपोवनात सिंहस्थासाठी प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे त्या इमारतीची क्षमता वाढविली जाणार आहे.

आयुक्तांच्या सूचना

- होळकर पुलाच्या डाव्या बाजूला पायऱ्या.

- महात्मा गांधी ज्योत नूतनीकरण.

- गांधी तलावाचे सुशोभीकरण.

- नदीकाठावरील सार्वजनिक शौचालय यांची दुरुस्ती.

- गणेश वाडी येथे अमरधाम समोरील पार्किंग विकसित करणार.

- श्री काळाराम मंदिर व परिसर सुशोभीकरण.

- जुने गणेशवाडी पंपिंग स्टेशन येथे अग्निशमन केंद्र.

- साधूग्राम कमानीचे सुशोभीकरण.

- बटुक हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविणार.

"सिंहस्थ आराखड्यात सुचविण्यात आलेल्या कामांच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. आवश्‍यक तेथे सुधारणा, नवीन कामे केले जातील. आवश्‍यक नसलेली कामे वगळली जातील. विकासकामांची नियमित पाहणी केली जाईल." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT