nmc esakal
नाशिक

NMC News : थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडवर; 20 नळ जोडण्या तोडल्या

NMC : ९५.७५ कोटी रुपये थकबाकी वसुल करण्यासाठी मनपा पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : मार्चच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर ९५.७५ कोटी रुपये थकबाकी वसुल करण्यासाठी मनपा पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. पहिल्या दिवशी वीस नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या असून मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (nashik Municipality marathi news)

पाणी पुरवठा व विविध कर विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी संयुक्त मोहीम सुरु करण्यात आली आहे. शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदार वसुली पथकाच्या रडारवर आहे. घरपट्टीत समाधानकारक वसुली झाली असली तरी पाणीपट्टी मात्र असमाधानकारक आहे. त्यात मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने वसुलीवर त्याचा परिणाम होईल.

त्यामुळे पाणी पुरवठा व विविध कर विभागाच्या वतीने पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. कारवाईअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीसांनंतरही थकबाकी अदा न केल्याने नळजोडणी खंडीत करण्याची मोहिम सुरु करण्यात आली. शहरात एकूण २ लाख ७ हजार नळ जोडणीधारक असून त्यातील ४४ हजार ३८५ नळ जोडणीधारकांकडे ९५.७५ कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे.

पाणीपुरवठा व कर वसुली विभागाने संयुक्तरित्या गुरुवार पासून (ता. २२) कारवाई सुरु केली. मोहिमेसाठी विभागनिहाय पथके तयार करण्यात आली. पहिल्या दिवशी २० नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. दिवसभरात दीड लाख रुपये थकबाकीदारांकडून वसुल करण्यात आले.

''पाणी पुरवठा योजनेवरील खर्च किमान ना नफा ना तोटा या तत्त्वावर तरी चालविण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई आवशक्य आहे. थकबाकी वसुलीसाठी कटू निर्णय घ्यायला लागू नये यासाठी थकबाकी भरावी.''- संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा

पाणीपट्टीचे थकबाकीदार (थकबाकी रक्कम कोटी रुपये)

विभाग थकबाकीदारांची संख्या

पंचवटी १२,१४४ (२३.७५)

नाशिकरोड ६,९०४ (१७.३५)

पश्चिम १६२० (६.९०)

पूर्व ८,५१८ (१८.४२)

सातपूर ७,४८६ (१४.६७)

सिडको ७,७१३ (१४.६४)

एकूण ४४,३८५ (९५.७५) (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT