Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी (ता. ५) अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली. तत्पूर्वी प्रारूप मतदारयादीत दुरुस्तीचे एकूण १२९ अर्ज प्राप्त झाले होते. निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवार (ता. ६) पासून उमेदवारी अर्ज विक्री, स्वीकृती केली जाणार आहे. (Naik Education Institute Election Sale of nomination form acceptance from today)
नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत यापूर्वीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. या यादीसंदर्भात दुरुस्ती, हरकत अर्ज मागविण्यात आले होते. ही मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. निर्धारित कालावधीत १२९ अर्ज प्राप्त झाले होते. अर्जाचे स्वरूप आणि उपलब्ध अभिलेख पाहता अर्जांचा निपटारा करण्यात आला.
त्यानुसार काही अर्ज मंजूर तर काही फेटाळण्यात आले. यानंतर सायंकाळी साडे पाचला अंतिम सभासद मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक मंडळातर्फे जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवारपासून उमेदवार अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची खऱ्या अर्थाने रंगत बघायला मिळणार आहे.
त्या २७७ सभासदांची नावे काढली यादीतून
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यापूर्वी २७७ मृत सभासदांची नावे कमी करण्यात आलेली असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. जालिंदर ताडगे यांनी दिली आहे. अधिक माहिती देताना ॲड. ताडगे म्हणाले, की पूर्वीच्या यादीत नाव असलेले परंतु प्रारूप यादीत समाविष्ट नसलेल्या दोन सभासदांची पडताळणी करून त्यांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली आहे. यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. (latest marathi news)
उमेदवारीवरून खलबते..
यंदाच्या निवडणुकीमध्ये दोनपेक्षा जास्त पॅनलची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे. अशात इच्छुकांकडून पॅनल प्रमुखांची भेट घेत चाचपणी केली जाते आहे. उमेदवारीवरून खल सुरु असून, येणारा आठवडा हाय व्होल्टेजचा राहणार आहे. अनेक इच्छुकांकडून सभासदांच्या गाठीभेटींचा ओघ वाढविला आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम...
* अर्ज विक्री व स्वीकृतीची मुदत------६ ते ९ जुलै स.११ ते दु.४
* अर्जांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी------------१० जुलै
* उमेदवारी अर्ज माघारीची मुदत--------११ ते १३ जुलै
* उमेदवारांना निशाणीचे वाटप----------१३ जुलै
* पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान-----२७ जुलै
* मतमोजणीची तारीख-----------------२८ जुलै
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.