mpsc esakal
नाशिक

Nashik News : अर्ज नसतानाही यादीत उमेदवाराचे नाव; ‘MPSC’चा अजब कारभार

Nashik : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या अजब कारभाराची प्रचीती उमेदवारांना आली आहे. कर सहाय्यक पदासाठी अर्ज केलेला नसतानाही मुख्य परीक्षेच्‍या निवड यादीत काही उमेदवारांचे नाव असल्‍याचे आढळून आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या अजब कारभाराची प्रचीती उमेदवारांना आली आहे. कर सहाय्यक पदासाठी अर्ज केलेला नसतानाही मुख्य परीक्षेच्‍या निवड यादीत काही उमेदवारांचे नाव असल्‍याचे आढळून आले. यादरम्‍यान या गोंधळामुळे इतर उमेदवारांना फटका बसण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. आयोगाने दुरुस्‍तीसह निकाल पुन्‍हा जाहीर करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे. (Nashik Name of mpsc candidates in list even without application marathi News)

यासंदर्भात अधिक माहिती अशी, की राज्य लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी अराजपत्रित गट क संवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. साडेसात हजार पदांसाठी याद्वारे भरती केली जाणार होती. नियोजित वेळापत्रकानुसार आयोगाने एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा १७ डिसेंबरला घेण्यात आली. यात लिपिक संवर्गासाठी सात हजार ३५, कर सहायक पदासाठी ४६८, तांत्रिक सहाय्यक एक आणि राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षकसाठी सहा जागा नमूद केलेल्‍या होत्‍या.

दुय्यम निरीक्षक व तांत्रिक सहाय्यक या पदांचे निकाल आधीच जाहीर झालेले आहेत. सोमवारी (ता. १५) कर सहाय्यक पदासाठी निकाल जाहीर करण्यात आला. यात कर सहाय्यकपदासाठी अर्जच केलेले नाहीत, अशा उमेदवारांच्या नावांचा निवड यादीत समावेश असल्‍याने सर्वांचे डोळे चक्रावले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.(latest marathi news)

पीएसआय परीक्षेतही अशीच होती चूक

यापूर्वी २०२२ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेच्‍या निकालात अशीच चूक झाली होती. पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पात्र नसलेले खेळाडू उमेदवार पात्र ठरविण्यात आले होते. यासंदर्भात उमेदवारांनी आवाज उठविल्‍यावर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निकालात दुरुस्‍ती करताना सुधारित निकाल जाहीर केला होता. या चुकीची पुनरावृत्ती झालेली असून, आयोगाने सुधारित निकाल प्रसिद्ध करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.

कौशल्य चाचणीसाठी अपात्र उमेदवार पात्र

एकही प्रमाणपत्र नसणारे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन उमेदवार प्रवर्गासाठी आरक्षण लागू नाही, तसेच एक प्रमाणपत्र असून, पात्र ठरलेले उमेदवार कर सहाय्यकसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन प्रमाणपत्रे आवश्यक असतानाही पात्र केले आहेत. तसेच, दोन्ही प्रमाणपत्रे असलेले; परंतु कर सहाय्यक पूर्व परीक्षाच उत्तीर्ण नाहीत, असे उमेदवारही पात्र ठरविले आहेत.

''कर सहाय्यकपदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण न करणारे तसेच फक्‍त टंकलेखकपदासाठी मुख्य परीक्षेचा अर्ज केलेल्‍या उमेदवारांचीही नावे कर सहाय्यक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरविली आहेत. याचा अर्थ कर सहाय्यक मुख्य परीक्षेसाठी अर्ज केलेला नसतानाही असे उमेदवार उत्तीर्ण ठरविले आहेत. या गोंधळामुळे इतर उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. एमपीएससीने सुधारित निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.''- आजम शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

Amit Shah : छत्रपतींच्या गडसंवर्धनासाठी दोन हजार कोटींची तरतूद...अमित शहा : उमरखेड येथील प्रचारसभेत काँग्रेसवर साधला निशाणा

Suryakumar Yadav: प्रतिष्ठेची टोपी! सूर्यानं खाली पडलेली इंडियाची कॅप उचलून केलेल्या कृतीनं जिंकली मनं, Video Viral

SCROLL FOR NEXT