The arrival of onions in the market committee at Nampur on Monday. esakal
नाशिक

Onion Rate : नामपूरला कांद्याला 3300 पर्यंत दर! नियमित लिलावामुळे आवक वाढली

Nashik News : नामपूर येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात सोमवारी (ता. २४) एक हजार ४१२ वाहनांमधून सुमारे ३० हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात सोमवारी (ता. २४) एक हजार ४१२ वाहनांमधून सुमारे ३० हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. नामपूर येथे कांद्याच्या दरात २०० ते २५० रुपयांची वाढ मिळाल्याचे उत्पादकांनी सांगितले. कांदा मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने दरात सुधारणा झाल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले. (Nampur onion price up to 3300)

जिल्ह्यात कांद्याची आवक घटल्याने गत सप्ताहात पहिल्यांदा चार हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर एकाच दिवसात पुन्हा कांद्याचे दर सरासरी तीन हजारांपर्यंत आले. सोमवारी उन्हाळ कांद्याला तीन हजार ते तीन हजार ३०५ रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती सभापती मनीषा पगार, उपसभापती युवराज पवार, सचिव संतोष गायकवाड यांनी दिली.

सध्या कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करीत आहेत. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे नळकस रस्त्यालगत वाहतूक विस्कळित झाली होती. परिसरातील गावांमधून येथील बाजार समिती, मोसम कृषी खासगी बाजार समिती, करंजाड उपबाजार आवारात कांद्याची आवक होत आहे. सकाळी दहापासून लिलावाला सुरवात झाली.

नामपूरला ४६२, मोसम खासगी बाजार समितीत ५०२, तर करंजाडला ४४८ वाहनांचे लिलाव करण्यात आले. बाजार समितीचे लिलाव नियमित सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यावर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, लिलाव काळात बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. (latest marathi news)

देशांतर्गत बाजारपेठेत काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे भाव वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बागलाण तालुक्यात सटाणा, नामपूर बाजार समितींसह दोन उपबाजार आवार असताना काही महिन्यांपासून खासगी कृषी मार्केट कार्यान्वित झाल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे.

नामपूर बाजार समिती दर आणि वाहन संख्या

*३००० ते ३३०५.....१२२

*२६०० ते ३०००.....१७९

*२००० ते २६००.....९९

*१४०० ते २०००......४१

*८०० ते १४००........२१

मोसम कृषी खासगी मार्केटचे दर

*३००० ते ३५००...........८६

*२८०० ते ३०००..........१०७

*२५०० ते २८००.........१२४

*२००० ते २५००........१२७

*१५०० ते २०००.........४३

*१००० ते १५००..........८

*७०० ते १०००..........६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT