patra stolen by thieves esakal
नाशिक

Nashik News : नामपूर क्रिडा संकुलाला उद्घाटनाची प्रतीक्षा! उद्घाटनापूर्वीच पत्रे चोरीला, दरवाजाची वाट

प्रशांत बैरागी

नामपूर : ग्रामीण खेळाडूंच्या विकासासाठी एक कोटी रुपये खर्चून मोराणे रस्त्यालगत बांधलेल्या तालुका क्रिडा संकुलाची उद्घाटनापूर्वीच दुरवस्था झाल्याने फिटनेस टेंपलच अनफिट बनले आहे. क्रीडा संकुलाचे पत्रे, क्रीडा साहित्य भुरट्यांनी चोरून नेले आहे. त्यामुळे आता दुरुस्तीसाठी तीन कोटीचा प्रस्ताव क्रीडा विभागाच्या विचाराधीन असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Nampur sports complex waiting for inauguration)

सटाणा शहरासाठी तालुकास्तरीय क्रिडा संकुल मंजूर करण्यात आले. परंतु सटाणा शहरात क्रिडा संकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध न झाल्याने मोराणे येथे क्रीडासंकुल उभारण्यात आले. मात्र, क्रीडासंकुलाच्या उद्घाटनाचा गेल्या आठ वर्षापासून शासनाला विसर पडला आहे.

समाजकंटकांकडून वाट

उद्घाटनाआधीच चोरून नेलेले पत्रे, तुटलेले प्रवेशद्वार, क्रिडा संकुलात झालेला कचऱ्याचा ढीग, तळीरामांचा अड्डा, साहित्याची झालेली मोडतोड यामुळे तालुका क्रिडा संकुलाची अवस्था कचराकुंडीसारखी झाली आहे. लोखंडी प्रवेशद्वार टवाळखोरांनी तोडून टाकले आहे. क्रिडा संकुलाच्या भूमिपूजनापासून सुरु झालेली श्रेयवादाची साडेसाती अदयाप नामपूरकरांचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे क्रिडा प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (latest marathi news)

उद्घाटनापासून वाद

यापूर्वी १५ ऑगस्ट २०१४ ला तत्कालीन आमदार उमाजी बोरसे यांच्या भूमीपूजन हस्ते झाले. त्यानंतर सत्तांतर झाल्याने राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण यांच्या हस्ते एका वर्षानंतर पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गदारोळ निर्माण झाला होता. दोन वेळा भूमिपूजन होऊनही गेल्या गेल्या पाच वर्षापासून क्रिडा संकुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने क्रिडा प्रेमीं नाराज आहे.

"तरुण सोशल मीडियामुळे खेळापासून दूर जात असताना क्रीडा संकुल ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी वरदान आहे. भग्नावस्थेत असलेल्या क्रिडा संकुलामुळे मन विषण्ण होते. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेऊन क्रिडा संकुल सुरु करावे."

- अनिल सावंत, राष्ट्रीय हँडबालपटू, नामपूर

"क्रीडा विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. राज्यात सर्वच तालुका क्रीडा संकुलांची अवस्था वाईट आहे. नामपूरचे क्रीडा संकुल शहरापासून लांब अंतरावर असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. ग्रामपंचायत प्रशासन, सेवाभावी संस्था, क्रीडा संस्था यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुका क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्याची बाब विचाराधीन आहे."-सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: कुणबी दाखले मिळवतानाच्या अडचणी आता कमी होणार! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

Atal Setu: गाडी थांबवली अन् व्यक्तीची अटल सेतूवरून समुद्रात उडी, वर्षभरातील चौथी घटना

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या सरकारचा निर्णय, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

SCROLL FOR NEXT