Nandgaon MSRTC Depot esakal
नाशिक

Nandgaon MSRTC Depot : नादुरुस्त बस..? हमखास नांदगाव डेपोचीच

संजीव निकम

नांदगाव : वर्दळीच्या मार्गावर केवळ कधीही नादुरुस्त होणारी बस उभी दिसली की ती हमखास नांदगाव आगाराची असेल अशी चेष्टा कायम होत असते.नांदगाव आगाराच्या बस वेळेवर सुटत नाहीत. यात आता, अलीकडे रस्त्यावर बंद पडणाऱ्या बसची भर पडली आहे.

नांदगाव बस स्थानकातून रोज१७३०० प्रवासी प्रवास करतात. त्यांच्यासाठी नव्या बस तर दूर आहे पण नियोजित फेऱ्यांसाठी दहा बसची कमतरता आहे. अशा आधीच अपुऱ्या बसपैकी अनेक बंद पडल्याच्या घटनांची हॅटट्रिकही, इंधन बचतीचे पारितोषिक मिळविणारे लांब पल्यांच्या वक्तशीर गाड्यांसाठी प्रसिद्ध नांदगाव आगाराच्या वाट्याला आली आहे. (Nandgaon MSRTC Depot Faulty bus)

स्थानिक पातळीवरून प्रयत्न होत असले तरी वरिष्ठ पातळीवरून देखील रिस्पॉन्स मिळायला हवा. ज्या आगाराची अशी हेटाळणी केली जाते त्याच नांदगाव आगाराचा इंधन बचतीत लौकिक मात्र कायम आहे. गेल्या वर्षी थेट चौतीस लाखाचा नफा मिळविणारा एकमेव डेपो म्हणून नांदगावने लौकिक राखला.

ही सुद्धा दुसरी बाजू आहे. चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या येथील बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. बस स्थानकात प्रवेश करताच दर्शनी भागात मोठ्ठे खड्डे, तुटलेली तावदाने,नादुरुस्त अस्वच्छ बाक,असूनही नसल्यासारखे प्रसाधनगृह अशा असुविधांत रोज साधारण १७२०० प्रवासी नांदगांव आगाराच्या बसने प्रवास करतात.

त्यात महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्ष वरील ज्येष्ठांना (मोफत) इतर ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा वाटा ५२ टक्के आहे. रोज ४८१३ विद्यार्थी व विद्यार्थिनी सवलत पासने प्रवास करतात. यात विद्यार्थी ६६.३३ टक्के सूट व १२ वी पर्यंत सर्व विद्यार्थिनी यांना १०० सूट (मोफत ) आहे. मानव अधिकार आयोग कडून ७ मानव विकास बस फक्त विद्यार्थिनी साठी धावतात. (latest marathi news)

"नांदगाव आगारासाठी शासनाकडून पाच कोटी रुपये मंजूर झाले असून नवे अत्याधुनीक बसस्थानक येत्या वर्षभरात उभारण्यात येत असून आगारातील तांत्रिक विभाग व अन्य ठिकाणी आस्थापनेवर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्या कामाचा शुभारंभ होईल."- आमदार सुहास कांदे

"बुडणाऱ्या जहाजात जसे कोणीही थांबत नाही. तसे यावेळी ही प्रवासी सवयीने जमेल तसे मिळेल त्या बसने उभे राहून धक्का बुक्की खात उशिराने पोचतात. आगाराने नव्या गाड्या सुरु करण्याऐवजी आहे त्या गाड्या व त्यांचे वेळापत्रक पाळले तरी पुरेसे ठरणार आहे."

- विलासराव साळुंके (तालुकाध्यक्ष, नांदगाव तालुका प्रवासी संघटना)

नांदगांव आगाराची स्थिती

चालक ८९

चालक तथा वाहक 30

वाहक ८६

यांत्रिक २८

प्रशासकीय १८

एकूण २५१ कर्मचारी

(एकूण ४२ कर्मचारी कमी आहेत)

एकूण बस ५२

एकूण फेऱ्या २९४

दैनिक किलोमीटर १७२०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT