PM Crop Insurance Yojana  esakal
नाशिक

Crop Insurance : नांदगाव तालुक्याला मिळाले पीकविम्यापोटी 125 कोटी

Crop Insurance : तालुका दृष्काळसदृश जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांना कुठलीही सवलत किंवा आर्थिक मदत न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Crop Insurance : तालुका दृष्काळसदृश जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांना कुठलीही सवलत किंवा आर्थिक मदत न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला होता. याची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे नांदगाव तालुक्याला पीकविम्यापोटी सुमारे १२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दृष्काळसदृश तालुक्यांना मदत देण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्याने तालुक्यात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. (Nandgaon taluka received 125 crore for crop insurance)

दृष्काळी तालुके जाहीर झाल्यावर शेजारच्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना अनेक सवलती व आर्थिक मदत मिळाली. मात्र, खऱ्या अर्थाने दृष्काळी असतानाही माझ्या तालुक्यावर अन्याय का, असा सवाल करीत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात विमा कंपनी व राज्य शासनाला प्रतिवादी बनवत माझ्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना ही आर्थिक मदत मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला होता. (latest marathi news)

आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांनी भक्कम बाजू मांडली अन् नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या निकालामुळे राज्य शासन व संबंधित पीकविमा कंपनीकडून नांदगाव तालुक्याला सुमारे १२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार कांदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

''माझी बांधिलकी शेतकऱ्यांबरोबर कायम आहे. यापुढेही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असेन. नजीकच्या काळात शेतीशी निगडित सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.''- सुहास कांदे, आमदार, नांदगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT