Nandur Madhyameshwar esakal
नाशिक

Nashik News : गाळाने भरलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाकडे दुर्लक्ष

Nashik : नांदूर मधमेश्वर धरणात शंभर वर्षं अधिक काळ गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी आलेल्या महापूरामुळे गाळ साचला आहे मात्र निवडणुकीत व्यस्त स्थानिक राजकारणी मंडळी याविषयावर उदासीन आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक नगर आणि मराठवाडा जिल्ह्याची लाइफ लाईन म्हणून संबोधले जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर धरणात शंभर वर्षं अधिक काळ गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी आलेल्या महापूरामुळे गाळ साचला आहे मात्र निवडणुकीत व्यस्त स्थानिक राजकारणी मंडळी याविषयावर उदासीन आहेत. खानगाव थडी (ता.निफाड) येथे ११६ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी नांदूर मधमेश्वर धरणाची निर्मिती झाली. (Nashik Nandur Madhyameshwar dam full of silt is neglected marathi News )

शंभर वर्षांत गोदावरी दारणा कादवा आणि त्यांच्या उपनद्यांच्या महापूरामुळे नांदूर मधमेश्वर धरण पूर्णतः गाळाने भरून गेले आहे. या धरणाची क्षमता शंभर वर्षांपूर्वी १००० दलघफूट इतकी होती आता ती २५० दलघफू झाली आहे. म्हणजेच साधारण ७५ टक्के या धरणात गाळ असून २५ टक्के पाणी साठा होतो.

टंचाईत आठवण

दिवसेंदिवस या धरणावर पाण्याचा ताण वाढत जाऊन पिण्यास शेतीच्या प्रश्न निर्माण होत आहे. आधीच तुटीचे खोरे असलेल्या गोदावरीत नाशिक नगर आणि मराठवाडा पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आता धरणात गाळ साचल्याने पाण्याचा प्रश्न जटील होत आहे. येथून गोदावरी कालवे मराठवाडा एक्सप्रेस कालवा यातून पाणीपुरवठा होतो.

शिर्डी. राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, येवला, सिन्नर येथील नगरपालिका नगरपरिषद तसेच अनेक अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणाची पाणी साठवणक्षमता घटल्याने आघाडी सरकारच्या काळात २००८ मध्ये धरणाचे नूतनीकरण करण्यात येऊन आठ वक्राकार गेट बसविले.

आत्ताही आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांनी पुन्हा दहा गेट बसविण्याच्या कामास मंजुरी मिळाल्याने धरणातील साचलेला गाळ पुराबरोबर वाहून जाऊन धरणाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. साठलेल्या गाळावर कुणी बोलत नाही.

''गोदावरी नदीस येणाऱ्या महापूरामुळे वर्षानुवर्षे आलेल्या गाळामुळे नांदूर मधमेश्वर धरणात पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आणि गोदाकाट भागातील गावांना याचा फटका बसत आला आहे.''-खंडू बोडके पाटील करंजगाव

''नांदूर मध्यमेश्वर धरणाचा गाळाचा प्रश्न नवीन १० गेट मंजुरी झाल्याने प्रत्यक्षात सुटणार असल्याने गोदाकाठ चा शेतकरी म्हणून समाधान आहे.''-शिरीष गडाख संचालक पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी उपसरपंच चांदोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

SCROLL FOR NEXT