पिंपळगाव बसवंत : पूरस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावांसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूरमध्येश्वर धरणांवरील दहा वक्राकार दरवाजांना हिरवा कंदील दिला आहे. जलसंपदा विभागाने तब्बल २२७ कोटी रुपये कामासाठी मंजूर केले आहेत.
निधी उपलब्ध होऊन शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या दीड वर्षात हे काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. नांदूरमध्येश्वर धरणालगत पर्यटनस्थळ विकासासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले. (Nashik Nandur Madhyameshwar fund Water Resources Department marathi news)
नांदूरमध्यमेश्वर धरणांवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, कार्यकारी अभियंता सोनल सहाणे उपस्थित होते. आमदार बनकर म्हणाले, की २००४ मध्ये आमदार असताना, नांदूरमध्येश्वर धरणावर ६८ कोटी रुपयांतून आठ वक्राकार दरवाजा बसविल्याने पुराची तीव्रता कमी झाली होती.
पुराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दुसऱ्यांदा आमदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार वर्षांत ३० हून अधिक बैठका मंत्रालयात घेतल्या. नांदूरमध्यमेश्वर धरणाला रामसर दर्जा असल्याने वाढीव दरवाजाची कामे करताना पर्यावरण, कृमीकीटकांना धोका होण्याची शक्यता होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने ड्रीम प्रोजेक्ट साकार होणार आहे. नवीन दरवाज्यांमुळे पुराचा पूर्ण धोका टळणार आहे. यासह धरणालगत विश्रामगृह, भोजनालय व परिसर विकासासाठी तीन कोटी मंजूर झाले आहेत. वृक्षसंवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी २७ कोटींचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करणार आहे. रस्ते, पूल, शासकीय इमारतींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे.
कार्यकारी अभियंता सोनल सहाणे म्हणाल्या, की वक्राकार दरवाजे साकारल्यानंतर सायखेडा, चांदोरी, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, कुरूडगाव आदी १६ गावांचा पुराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे म्हणाले, की आमदार दिलीप बनकर यांच्या चिकाटीमुळे न नांदूरमध्येश्वर धरणाचे काम पूर्ण होणार आहे. (Latest Marathi News)
शिवाजी ढेपले, जगन कुटे, दीपक बोरस्ते, नंदू सांगळे, पंडित सांगळे, भाऊसाहेब भवर यांनी मनोगतात आमदार बनकर यांच्यामुळे नांदुरमध्यमेश्वर धऱणाचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे स्पष्ट केले. रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, सोपान खालकर, सागर कुंदे, बबन जगताप, शिरीष गडाख, विजय कारे आदी उपस्थित होते.
दहा दरवाजे ठरणार वरदान...
इंग्रज राजवटीतील व उभारणीला १०० वर्षे पूर्ण झालेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाचे रूप खऱ्या अर्थाने पालटणार आहे. जल प्रकल्प खरतर परिसराला वरदान ठरतात, पण नांदुूमध्यमेश्वर धरण पावसाळ्यात रौद्ररूप घेऊन फुगवट्याचे पाणी २० हून अधिक गावातील शेत व घरांमध्ये थरकाप उडवायचे.
पूर्वीचे आठ व नव्याने दहा दरवाजे बसविले जाणार असल्याने सव्वादोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. १२ मीटर उंची व आठ मीटर रूंदी आकाराचे दहा वक्राकार दरवाजे पूरस्थिती इतिहास जमा करणार असून, धरणाला नवा लूक देणारे व परिसराला वरदान ठरतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.