Nashik News : आदिवासींसाठी जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किंवा तमाशा... मात्र, माझ्या बांधवांना न्याय मिळायला हवा, अशी आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांना कोणाला जाळीवर उड्या मारण्याचा प्रयोग करायचा असेल, त्यांनी मात्र डबल जाळी लावून उडी मारावी.
आम्ही आदिवासी जाळी नसलेल्या ठिकाणीही उडी मारू शकतो, असा पलटवार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला. राज्य सरकारच्या धनगड दाखले रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (zirwal Will challenge decision to cancel Dhangad certificates)
आदिवासी समाजातील विविध प्रश्न तसेच पेसासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीसाठी जात असतानाच आमदारांनी जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. त्यावर राजकीय वर्तुळातून भाष्य केले जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी उत्तर दिले. राज्य सरकारच्या धनगड दाखले रद्द करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना राज्य सरकारला दाखले रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. धनगड आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याची माहिती त्यांनी दिली.
धनगड दाखले रद्द होऊ शकतात तर आदिवासींमधील बोगस आदिवासींचे दाखलेही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. तेव्हा सरकारला अधिकार नसल्याचे सांगत सरकारने हात झटकले होते. मग सरकारने हा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या संदर्भात भेट घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (latest marathi news)
पिचड यांनी आदिवासींचा पक्ष असावा, अशी भूमिका मांडली असली तरी आदिवासी नेते आदिवासींच्या प्रश्नावर एकत्र येत असल्याने पक्ष काढण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले. धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केल्यावर मला तंगडे तोडण्याची धमकी दिली गेली. मात्र, मी तक्रार केली नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
पवारांसमोर जाण्याची हिंमत नाही
शरद पवार यांच्यापासून ज्या दिवसापासून मी बाजूला गेलो, त्यानंतर त्यांच्यासमोर कधीही गेलो नाही. त्यांच्यासमोर जाण्याची माझी हिंमत नाही. त्यांच्यासमोर जाताना प्रगल्भता असावी, ती माझ्यात नसल्याचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी सांगितले. गोकुळ झिरवाळ माझं ऐकेल, तो कुठेही जाणार नाही. निवडणुकीत तो माझ्या मागे उभा राहील, असा विश्वास त्यांनी मुलाबद्दल व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.