Nashik Market Committee  esakal
नाशिक

Nashik Market Committee News : नाशिक बाजार समिती उत्पन्नात एप्रिलमध्येच 84 लाखाने वाढ!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee News : नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात यंदाच्या वर्षी एकट्या एप्रिलमध्येच तब्बल ८४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये झालेली पदभरती खऱ्या अर्थाने लाभदायी ठरल्याचे सांगत विद्यमान सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी या भरतीला विरोध करणाऱ्या माजी सभापतींचा दावाही फोल ठरल्याचे म्हटले आहे. (Nashik Nashik Market Committee income)

नाशिक बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात जिल्हाभरातून हजारो शेतकरी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात. तसेच, पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, लसूण डाळिंब, इतर फळे व अन्नधान्याची मोठी उलाढाल होत असते.

त्यामुळे दैनंदिन मार्केट फी हे बाजार समितीचे मूळ उत्पन्नस्त्रोत आहे. मात्र अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे या उत्पन्नात हवी तशी वाढ होत नसल्याची बाब सभापती पिंगळे यांच्या निदर्शनास आली. या बाबीचा सखोल अभ्यास करून त्यांनी बाजार समितीमध्ये विविध पदांवर ४७ कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार शासकीय नियमानुसार भरती प्रक्रिया पारही पडली आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या. त्याचा परिणाम असा झाला की, बाजार समितीला मागील वर्षी एकट्या एप्रिलमध्ये १ कोटी ४५ लाख १४ हजार ४९२ रुपये इतके उत्पन्न झाले होते. त्या तुलनेत या वर्षी एप्रिलमध्येच २ कोटी २९ लाख ५६ हजार ६६९ रुपये उत्पन्न झाले. (Latest Marathi News)

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पन्नात तब्बल ८४ लाख ४२ हजार १७७ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांचा सहकारातील अनुभव गाठी असल्याने सभापती पिंगळे यांनी या अनुभवाच्या जोरावर आखलेली रणनीती आणि उत्पन्नाचे स्तोत्र असलेल्या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये केलेल्या बदलाचा परिणाम म्हणून उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया अन्य संचालकांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यासाठी विशिष्ट पथक

बाजार समितीच्या आवारात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून शेतकरी पालेभाज्या फळभाज्या घेऊन येत असतात. शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या आवारात कुठल्याही प्रकारची अडचण किंवा त्रास झाल्यास ते कार्यालयात संपर्क साधतात. सहा कर्मचाऱ्यांचे नेमलेले पथक तत्काळ त्या शेतकऱ्याच्या मदतीस धावून जाते आणि त्यांच्या समस्येचे निराकरण करते.

"बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी केवळ विरोधक म्हणून विरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याने भरती प्रक्रिया राबवून ४७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले. भरतीमुळे बाजार समितीचे कुठलेही नुकसान झाले नसून उत्पन्नात वाढ झाली आहे."

- देविदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT