National Horticultural Research Center esakal
नाशिक

Nashik News : बियाण्यांची गुणवत्ता दूरच, बोर्डच घशात घालण्याचे मनसुबे! 2 सिंग, गुप्तांमुळे ‘एनएचआरडीएफ’ संशयाच्या भोवऱ्यात

Nashik News : राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र मधील बिजेंद्रसिंग, राजबीरसिंग आणि पी. के. गुप्ता यांचे त्रिकूट परस्पर नियम बदलून हुकूमशहा झाले.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र (एनएचआरडीएफ)मधील बिजेंद्रसिंग, राजबीरसिंग आणि पी. के. गुप्ता यांचे त्रिकूट परस्पर नियम बदलून हुकूमशहा झाल्याने मूळ कामकाजातील शेतकऱ्यांच्या बियाणे विक्री गुणवत्तेबाबतही मोठी चालढकल केल्याचे समोर आले आहे. नाशिक व इतर जिल्ह्यांतून अनेक शेतकऱ्यांनी याबाबत संपर्क साधून संबंधितांच्या अरेरावीचा पाढाच वाचला. (National Horticultural Research Center)

यातून स्वस्तात घेतलेली बियाणे बिजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्ता यांनी परस्पर प्रमाणित करून मूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरले आहेत. आता नव्याने आलेले राजबीरसिंग हेही राजेशाही थाट गाजवत आहेत.

कोण आहेत पी. के. गुप्ता?

पी. के अर्थात प्रमोदकुमार गुप्ता हे याच संस्थेत सुरवातीला चितेगाव येथे सहव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची बदली सिन्नर येथे झाली व तेथून बागवानी केंद्राचे महाव्यवस्थापक म्हणून ते दिल्लीत नियुक्त झाले. हेच गुप्ता पुढे बिजेंद्रसिंग यांच्या मर्जीतले झाले. त्यांनी लासलगाव, सिन्नर आणि चितेगाव येथून नित्कृष्ट दर्जाचे बियाणे घेत दिल्लीतून प्रमाणित करण्याचे मनसुबे आखले.

यात प्रमाणित केलेल्या बियाणे खरेदीत शेकडो शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. काही वर्षांपूर्वी चितेगाव येथे अनेक शेतकऱ्यांनी येऊन याची तक्रार दिली; तर काहींनी न्यायालयात धाव घेतली. मालेगाव, सटाणा येथील काही शेतकरी शेती नुकसानीचा दावा न्यायालयात ठोकत त्यांच्याविरोधात उभे राहिले. (latest marathi news)

परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र हे बियाणे प्रमाणित असल्याचे सांगत वेळ मारून नेली. यामुळे उत्पादन क्षमतेत मोठी घट झाली. यातून गुप्ता यांनी बक्कळ माल कमवत बिजेंद्र यांना गळ्यातील ताईत बनविले. शेतकरी आणि ‘एनएचआरडीएफ’मधला पूर्वीच्या कार्यकारिणीने निर्माण केलेला विश्वास तोडण्यास हेच पी. के. गुप्ता कारणीभूत ठरले.

गुप्ता यांनी बेकायदेशीररीत्या दिल्लीतील कृषी मंत्रालयांतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख म्हणून जवळपास पाच वर्षे सरकारी पगार घेतला. यावर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने आक्षेप घेतल्यावर त्यांना तत्काळ या पदावरून हटविण्यात आले. पुढे त्यांच्याकडून कोणत्याही सरकारी पैशांची वसुली झाली नाही, याचीही फाईल उघडण्यात यावी.

राजबीरसिंग ठरले डोईजड

केंद्रीय वनसेवेतून निवृत्त झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बिजेंद्र यांचे उजवे हात राजबीरसिंग यांनी गुप्ता यांची खुर्ची घेत कामकाजास सुरवात केली. परंतु, गेल्या वर्षभरापासून केवळ दिवसातून दोन तास अधिकार गाजवायला राजबीरसिंग येत असताना गुप्तांच्या कारभाराची चौकशी करण्याचे सोडून त्यांनी संस्थेने दिलेल्या सुविधा घेण्यातच रस मानला. राष्ट्रीय बागवानी अनुसंधानच्या बियाणांची गुणवत्ताही सिंग यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला नाही.

सध्या राजबीर हे मुख्य कार्यकारी अधिकारी असले, तरी ते भारतभर कोणत्याही शाखेशी जास्त संबंध ठेवत नाहीत. मुळात ही संस्था ग्राउंड फील्डवर ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वावर कार्यान्वित असूनही या त्रिकूट मित्रांनी मांडलेला उच्छाद राजा-महाराजांपेक्षा कमी नाही. बिजेंद्रसिंग यांच्या घरी, फार्म हाउसवर काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय खर्च, परदेश वाऱ्या यांचाही खर्च याच संस्थेने दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

याच राजबीरसिंग यांनी काही कोटींचा निधी बिजेंद्रसिंग यांच्या सांगण्यावरून सहकारी बँकेत वळविला आहे. याचा उपयोग त्या दोघांनी निर्माण केलेल्या खासगी कंपनीसाठी करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. यावर मातृसंस्था ‘नाफेड’ कोणती भूमिका घेऊन चौकशी लावते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित केंद्रीय यंत्रणांनी सर्वच कारभाराची चौकशी करून शेतीहित जोपासावे, असे आवाहन कांदा कॅपिटलमधील शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT