kanchan jagtap & jayashree tikande esakal
नाशिक

Women Kirtankar : आम्ही नवदुर्गा : संत परंपरेचे माहात्म्य सांगणाऱ्या महिला कीर्तनकार!

Latest Navratri 2024 News : महिला कीर्तनकार म्हटले की, आजही समाजातील काही तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये नकारात्मक भावना तयार होते. यावर मात करून समाज प्रबोधनाचे कार्य अहोरात्र सुरु ठेवण्याचा निर्धार या कीर्तनकार ‘नवदुर्गां’नी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम, संत बहिणाबाई यांसारख्या संत-महात्म्यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या वारकरी संप्रदायाचे समाज प्रबोधनाची धुरा महिला कीर्तनकार समर्थपणे सांभाळत आहेत. जिल्ह्यातील शंभरहून अधिक महिला कीर्तनकारांनी या क्षेत्रात नैपुण्य मिळवले असून, कीर्तनातून महिलांच्या समस्या मांडणे व त्यांचे प्रबोधन करण्याचे सत्कार्य त्यांच्या हातून घडत आहे.

परंतु, महिला कीर्तनकार म्हटले की, आजही समाजातील काही तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये नकारात्मक भावना तयार होते. यावर मात करून समाज प्रबोधनाचे कार्य अहोरात्र सुरु ठेवण्याचा निर्धार या कीर्तनकार ‘नवदुर्गां’नी व्यक्त केला. (Navratri 2024 Navadurga Women Kirtankar)

महाराष्ट्राच्या संत परंपरेत महिला संतांचे स्थान अढळ आहे. त्यांनीच वारकरी संप्रदायाचा पाया रचल्यामुळे महिलांना परंपरेनुसार कीर्तनाचा अधिकार प्राप्त होतो. किंबहुना पुरुष कीर्तनकारांपेक्षा काही ठिकाणी महिला कीर्तनकारांना जास्त प्रतिसाद मिळताना दिसतो.

त्याचे प्रमुख कारण म्हणजे एखादी महिला कथा, प्रवचनातून जो दृष्टांत मांडते तो तिने आयुष्यात अनुभवलेला असतो. किंवा महिलांच्या भावना तिला जास्त कळत असाव्यात म्हणून महिला कीर्तनकारांच्या प्रवचनांना महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

वारकरी संप्रदाय सांगतो की, ‘यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर।’ या अभंगाचा अर्थ वारकरी संप्रदायात कुठलाही जातीभेद, वर्णभेद, लहान-थोर असा भेदवाद केला जात नाही. किंबहुना ‘भलते’ याचा अर्थ तृतीयपंथींनाही वारकरी संप्रदायाने स्थान दिले आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण आणि आपले प्रभावी वत्कृत्व व भाषाशैलीच्या जोरावर समाज प्रबोधनाचे सत्कार्य यापुढेही निश्‍चयाने सुरु ठेवण्याचा निर्धार आजच्या नवदुर्गांनी केला. (latest marathi news)

"महिला आपल्या कीर्तनातून मांडणारा दृष्टांत, सिद्धांत हा तिने आयुष्यात कधीतरी अनुभवलेला असतो. त्यामुळे तिच्या कीर्तनाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ‘ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयासी’ चटकन उतरत असल्यामुळे महिला कीर्तनकारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे."

- कांचन जगताप, कीर्तनकार

"महिला कीर्तनकारांमध्ये प्रतिभा आहे. समाज प्रबोधनाचे कार्य त्या समर्थपणे करू शकतात. समाज परिवर्तनाचे समर्थ माध्यम म्हणून कीर्तनाकडे बघितले जाते. वारकरी संप्रदायाच्या विचारांची ताकद कीर्तनकारांच्या वाणीतून प्रकटते. त्यामुळे महिला किंवा पुरुष हा भेदाभेदच अनाठायी ठरतो."- जयश्री तिकांडे, कीर्तनकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT