Chief District and Sessions Judge present during the Panchamrit Mahapuja and installation of the first garland of Adimaye's Sharadiya Navratri Festival & carrying Adimaye's ornaments in a procession to the temple Shri Saptashring Niwasini Devi Trust esakal
नाशिक

Navratri: आदिमायेच्या शक्ती, भक्तीच्या संगमाच्या चैतन्यपर्वास सुरुवात! सप्तशृंगगडावर पहिल्या माळेला पंचामृत महापूजा, विधिवत घटस्थापना

Latest Navratri 2024 News : श्री भगवतीच्या मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांच्या आकर्षक फुलमाळेच्या केलेल्या तोरणमाळा, झुंबर यांची सजावट व आकर्षक चांदीच्या मखरीतील आदिशक्तीचे तेजोमय, प्रफुल्लित, विलोभनीय मूळरूपाच्या दर्शनाने भाविक अक्षरश: भारावून जात होते.

सकाळ वृत्तसेवा

वणी : ‘या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:..,’चा पुरोहितांचा मंत्रघोष व ‘अंबे माता की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या घोषाने दुमदुमलेल्या सप्तशृंगगडावर श्रीशक्तीचे, मांगल्याचे, चैतन्याचे व उत्साहाचे प्रतीक असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या नवरात्री पर्वाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

श्री भगवतीच्या मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांच्या आकर्षक फुलमाळेच्या केलेल्या तोरणमाळा, झुंबर यांची सजावट व आकर्षक चांदीच्या मखरीतील आदिशक्तीचे तेजोमय, प्रफुल्लित, विलोभनीय मूळरूपाच्या दर्शनाने भाविक अक्षरश: भारावून जात होते. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखावर भाविक नतमस्तक झाले. (Panchamrit Mahapuja at Saptshringa gad)

बुधवारी (ता. २) घटस्थापनेच्या पूर्वसंध्येलाच घटस्थापनेसाठी हजारो भाविकांबरोबरच पोलिसांचा लवाजमा, इतर प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल झाली होती. गुरवारी (ता. ३) सकाळी साडेसहाला सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाच्या कार्यालयात पुरोहितांना पूजेची वर्णी दक्षणा देण्यात आली.

आदिमायेचा सोन्याचा मुकुट, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे पुतळी गाठले, सोन्याचा कोयरीहार, सोन्याची वज्रटीक, सोन्याची बोरमाळ, सोन्याची कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, सोन्याचा गुलाबहार, कंबरपट्टा, राजदंड आदी आभूषणांची विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते ट्रस्टच्या कार्यालयात विधिवत पूजा करण्यात आली.

त्यानंतर आभूषणांची ढोल-ताशांच्या गजरात व सप्तशृंगीच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत न्यासाचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी नऊला जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक आदिमायेच्या उत्सवमूर्तीवर पंचामृत महापूजा व अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर देवीला पिवळ्या रंगाचे भरजरी महावस्त्र नेसवून वाजतगाजत आणलेले सुवर्णालंकार परिधान करीत साजशृंगार करण्यात आला. आदिमायेची संकल्प आरती श्रीचंद डी. जगमलानी यांच्या हस्ते झाल्यानंतर न्यायाधीश जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी. व्ही. वाघ व पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या उपस्थितीत श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

या वेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त अॅड. ललित निकम, अॅड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, सरंपच रमेश पवार, संदीप बेनके, राजेश गवळी, अजय दुबे आदींसह हजारो भाविक उपस्थित होते. (latest marathi news)

भगवतीचे २४ तास दर्शन

गुरुवारी दुपारपर्यंत शेकडो मंडळ कार्यकर्ते मशाली पेटवून गावाकडे अनवानी मार्गस्थ होत होते. दरम्यान, गुरुवारी पहिल्या माळेस लाखावर भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. बारा हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रोत्सवादरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरू असून, येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे.

सप्तशृंगगड परिसरात २५६ सीसीटीव्ही कार्यरत असून, एकूण १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ४० व तीन बंदूकधारी सुरक्षारक्षक व महाराष्ट्र राज्य पोलिस, राज्य गृहरक्षक दल, कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत. ऐनवेळेस उद्‌भवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून गडावर खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

परिवहनकडून विशेष बससेवा

भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना नांदुरी येथून ने-आण करणार आहेत. सप्तशृंगगडापासून एक किलोमीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी १३० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक येथून थेट सप्तशृंगगडावर जाण्यासाठी ९५ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर आगारांतून ७० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT