A crowd of women gathered at the unique ground to play Dandiya even in the drizzling rain. esakal
नाशिक

Navratri Festival 2024 : गुजराती हिंदी गीतांसोबत अहिराणीचा तडका! रिमझिम पावसातही दांडिया खेळण्यासाठी महिलांची तोबा गर्दी

Latest Navratri 2024 News : आजपासून रात्री बारापर्यंत गरबा आणि दांडियासाठी परवानगी मिळाल्याने शेवटचे दोन दिवस सर्वच दांडिया मैदानांमध्ये गर्दीचा महापूर येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : यंदाच्या नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियासाठी गुजराती सोबत हिंदी, मराठी आणि अगदी अहिराणी गीतांना सुद्धा मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. या भाषेतील उडत्या चालीच्या गीतांवर तरुणाई थिरकत आहे. आजपासून रात्री बारापर्यंत गरबा आणि दांडियासाठी परवानगी मिळाल्याने शेवटचे दोन दिवस सर्वच दांडिया मैदानांमध्ये गर्दीचा महापूर येणार आहे. (Navratri Festival 2024 Ahirani Tadka with Gujarati Hindi Songs)

बुधवारी (ता. ९) दुपारनंतर नाशिक शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. मात्र या परतीच्या पावसाचा दांडिया प्रेमींच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. रात्री अधूनमधून येणाऱ्या पाऊस धारा अंगावर घेत इंदिरानगर भागातील सर्वच दांडिया मैदानांमध्ये गर्दी झाली होती.

यंदा ' रमती आवे माडी रमती आवे’ या गुजराती गीताची मोठी मागणी आहे. त्या सोबतच 'गोरी राधा ने कालो कान' हे गीत देखील भाव खात आहे. त्याला तोडीस तोड 'गुलाबी साडी आणि ओठ लाल लाल,' ची धूम असून 'तू ग दुर्गा, तू ग भवानी'आणि 'अंबा चौक तुझा भरला, संबळचा आवाज येतो या अंबा माय ', या देवीच्या गीतांना देखील मोठी मागणी आहे.

यासोबतच 'मच गया शोर', 'आ देखे जरा, किस मे कितना है दम' या जुन्या हिंदी गीतांना देखील मोठी मागणी आहे. तर 'माय मना सम्राट ''सावन ना महिना मा' या अहिराणी गीतांचा तडका देखील दांडिया मैदानांमध्ये घुमत आहे. मालेगावची प्रसिद्ध तीन पावली, नाशिकचा ढोल,कावडी आणि संबळच्या ठेक्यावर तरुणाई धुंद होत आहे. (latest marathi news)

अखेरचे दोन दिवस

शेवटच्या दोन दिवसात लाखोंची बंपर बक्षीस जिंकण्यासाठी आता तरुणाईने झोकून दिले असून राणे नगर येथील युनिक ग्रुप, वासननगर येथील गामने मैदानातील शिवसेना उभाठा ,प्रशांत नगर येथील शिव छत्रपती कला, क्रीडा मंडळ ,चेतना नगर येथील सह्याद्री युवक मंडळ, वडाळा -पाथर्डी रस्त्यावरील श्री प्रतिष्ठान ,राजीव नगर येथील हिंदू जनसंपर्क कार्यालय,पांडव नगरी येथील नवदुर्गा मंडळ, सुचितानगर येथील सुचिता नगर मित्र मंडळ या सर्वच मंडळांची दांडिया मैदाने गर्दीने फुलली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT