Navratri Festival esakal
नाशिक

Navratri Festival 2024 : नवरात्रोत्सव : दैवी उपासना ते आरोग्य साधना

Latest Navratri Specials Article : नवरात्रीचे नऊ दिवस हे विशेष असतात. या दिवसांत आपल्यात आपोआपच एक विशेष आध्यात्मिक ऊर्ज निर्माण होत असते.

सकाळ वृत्तसेवा

‘‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥’’

नवरात्रीचे नऊ दिवस हे विशेष असतात. या दिवसांत आपल्यात आपोआपच एक विशेष आध्यात्मिक ऊर्ज निर्माण होत असते. असे मानले जाते की, या नऊ दिवसांत आपण शक्तीस्वरुप देवाच्या अगदी जवळ असतो. म्हणूनच या नऊ दिवसांत आपण या शक्तीचे जितके मनोभावे पूजन करु, तितके अधिक फळ आपणास प्राप्त व्हावे, या माताशक्तीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून सर्व वासनांचा त्याग करुन आपण भक्तिभावाने देवीची आराधना करायची असते.- वैद्य आनंद दशपुत्रे, जळगाव (मो.क्र. ९८२२६३७८५३)

(Navratri festival article divine worship to health practice )

सर्वांचे मंगल करणारी मंगलरुपी देवी, जी साधकांचे सर्व पुरुषार्थ अर्थात; धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रदान करते. अशा त्रिनेत्र गौरी नारायणीला माझे वंदन.. शक्तीचे रुप असलेल्या दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतींचे विशेष पूजन आपण या नवरात्रोत्सवात करत असतो. वासनांमध्ये सर्वांत जास्त वासना असते ती अन्नाची, तिचा त्याग म्हणून या दिवसांत ‘उपवास’ हा देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी सुचविलेला मार्ग आहे.

शरीरास आवश्‍यक तेवढाच शुद्ध, सात्विक अन्न असा आहार आपणांस घ्यायचा आहे. या आहारानेच आपले मन शुद्ध, सात्विक तसेच शरीर हलके व निरोगी राहते. ब्रह्मचर्य पालन, मऊ बिछाना, पादत्राणे याचा त्याग या नऊ दिवसांत केल्यास आपण मन प्रसन्न ठेवून आदिशक्ती मातेच्या अधिक जवळ जाऊ शकतो.

उपासनेतून आध्यात्मिक शांती

आज आपण समाजात बघतो की, षडरिपु अर्थात- काम, क्रोध, लोभ, मोह, मद्‌ आणि मत्सर यांनी मानवी मनावर अत्यंत वाईट परिणाम केला आहे. विविध कामनांमुळे भयंकर स्पर्धा, त्यातून निर्माण होणारा तणाव, थोड्या कारणांनी निर्माण होणारा क्रोध यातून घडणाऱ्या हत्त्या, आत्महत्त्या, विविध अपराध, लोभापोटी होणारे आर्थिक नुकसान, त्यातून निर्माण होणारा तणाव हे त्याचे परिणाम आहेत. मोह, मद आणि मत्सर यामुळे माणसामाणसांत, नात्यात, विविध समाजात निर्माण झालेली वितुष्टता या सर्वांपासून वाचण्यासाठी पूर्वीपासूनच आपल्या ग्रंथांमध्ये उपासना करुन आध्यात्मिक शांतता मिळविण्याचे मार्ग सांगितलेले आहेत.

‘स्वस्थ इत्याभि दियते..।’

स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगताना आयुर्वेदात ‘प्रसन्नआत्मेंन्द्रिय मन: स्वस्थ इत्याभि दियते’ असे म्हटलेय. म्हणजे आपण पूर्ण स्वस्थ तेव्हाच असू जेव्ह शरीरातील त्रिदीषांसोबत आत्मा व मनही प्रसन्न असेल. नवरात्रोत्सवात उपासनेने आपले मन व आत्मा प्रसन्न होतो. एक सकारात्मक ऊर्जा त्यातून आपल्यात निर्माण होत असते. त्यामुळे भय (Anxiety), तणाव (Stress) कमी होतो. नवरात्रीची तयारी करताना सर्वप्रथम आपण आपल्या घराची, देवघराची विशेष स्वच्छता करतो. देवीला विविध फुलांनी सजवितो, फुलोरा बनवून सात्विक असा नैवेद्य अर्पण करतो, त्यामुळे साहजिकच अशा प्रसन्न व उत्साहपूर्ण वातावरणाचा आपल्या शरीर व मनावर सकारात्मक परिणाम होऊन आपण उत्साही, आनंदी होतो. (latest marathi news)

आनंदी संप्रेरक

आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या वेदना, मनाला येणारे नैराश्‍य, चिंता, भय यांना घालविण्यासाठ काही Happy Hormones निर्माण केले जातात. जसे Endorphiris हा आनंद निर्माण करणारा संप्रेरक आपण जेव्हा व्यायाम करतारे तेव्हा आपोआप निर्माण होतो व तो शरीरातील डोकेदुखी, छोट्या छोट्या वेदना, तणाव यांना कमी करत असतो.

नवरात्रीत अगदी बेधुंद होऊन गरबा (दांडिया रास) करणाऱ्या सर्वांमध्ये हा Endorphiris आनंदी संप्रेरक निर्माण होतो, तसेच यासाठी करावी लागणारी विशेष वेशभूषा, पेहराव व मेकअप यामुळे Feel good संप्रेरक Dopamine निर्माण होत असणार, ज्यामुळे आपल्याला जीवनात काहीतरी करण्याची उमंग, प्रेरणा मिळते. तसेच Serotonin हा संप्रेरक भीती, निराशा यांना दूर करतो. एकंदरीत नवरात्रीचे नऊ दिवस आपल्यात एक विशेष सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची प्रक्रिया याद्वारे होत असते.

कसा करावा उपवास?

नवरात्रोत्सवात उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. काहीजण पूर्ण नऊ दिवस तर काहीजण पहिला व सातवा दिवस असे उपवास करतात. नवरात्रीतील उपवासाला आरोग्याच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. या उपवासातील सककारात्मक ऊर्जेतून आरोग्यासाठी लाभदायी गोष्टी घडस असतात. हा लाभ मिळण्यासाठी मात्र उपवास कसा करावा हे लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना मधुमेह झाला आहे, जे रुग्ण औषधी घेतात त्यांनी उपवास करणे टाळले पाहिजे किंवा त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एखादा उपवास करावा.

उपवासाचा खरा फायदा होतो तो Pre- Diabetic अर्थात, मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तींना. पुढील अनेक वर्षे उपवास, व्यायाम, पिष्टमय पदार्थांवर नियंत्रण करुन मधुमेह टाळता येऊ शकतो. उपवासाचा फायदा वजन नियंत्रित करण्यासाठी, Insulin resistance, महिलांमध्ये होणाऱ्या P.C.O.D. या आजारांमध्ये सर्वाधिक होतो. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपवास करताना वारंवार उपवासाचे काही पिष्टमय पदार्थ खाणे टाळले पाहिजे. बटाटे, रताळी, साबुदाणा, तळलेले वेफर्स हे पिष्टमय पदार्थांत येतात, ते आवर्जून टाळावे.

याउलट राजगिरा, भगर, पाणी जास्त असलेली फळे अर्थात- संत्री, मोसंबी, टरबूज, पपई, नारळाचं पाणी दिवसातून दोनवेळा घ्यावे. केळीसारखे पौष्टिक फळ उपवासात चालते, पण ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी केळी खाणे टाळावे. उपवासासाठी अनेक जण दुधाचे सेवन अधिक करतात. परंतु, दुधात असलेल्या Lactose या शुगरमुळे वजन वाढते, तसेच Lactoseही शुगर न पचल्याने दुधामुळे पोटफुगी, पोट साफ न होणे आदी त्रास होऊ शकतात. त्यामुळे दुधापेक्षा ताक, दही हे पदार्थ घ्यावेत.

ताक हे पचनासाठक्ष विशेष फायदेशीर असते, तसेत ताकामध्ये Carbohydrate नसल्यामुळे पोट भरतं, पण वजन वाढत नाही. आयुर्वेदात तर तक्र महात्म्य वर्णन करताना ‘तक्रम् शुक्रस्य दुर्लभम्‌’ अर्थात- ताक इन्द्रदेवाला सुध्दा दुर्मिळ असे वर्णन आढळते. नवरात्रीतील उपवासाचा फायदा होण्यासाठी जे काही खायचे आहे ते मोजून एक-दोनदाच वेळा ठरवून घ्यावे, इतर वेळी ईश्‍वर साधना, जप- उपासना केल्यास ‘उप-वास’ अर्थात- भगवंताच्या जवळ राहण्याचा खरा अर्थ सार्थक होईल. त्यातून शरीरातील आळस, गौरत्व, तंन्द्रा जाऊन उत्साह, चैतन्य, उमेद निर्माण र्होल. दुर्गा शक्तीचे रुप असल्याने आपल्या दैनंदिन व्यवहारात यशस्वी होण्यासाठी दुर्गा उपासनेत एक नवीन शक्ती निर्माण होईल.

उत्सव, उपवास.. उपासना

आज समाजात आपण पाहतो, सण, उत्सव अगदी मोठ्या स्वरुपात साजरे केले जातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात श्रींची, देवींच्या मोठ्या मूर्ती असतात. डीजे, रोषणाई भव्य दिव्य करण्यावर भर असतो. पण, हे उत्सव साजरे करत असत असताना त्यामागील मुख्य उद्देश, तत्त्व, शास्त्रीयता विसरता कामा नये. नवरात्रीत आपण शक्तीचे रुप असलेल्या देवीची उपसना अर्थात- स्त्री शक्तीची उपासना केली आहे.

स्त्रियांचा आदर करणे, सन्मान करणे यासह स्त्रियांवरील अत्याचाराला आळा बसेल अशी कृती आपल्याकडून घडावी. उत्सव अन्‌ उपवासाच्या माध्यमातून समाजात चांगले विचार, चांगली प्रेरणा, आनंदी संप्रेरक आणि सकारात्मक ऊर्जा आपण निर्माण करु शकलो तर ती खऱ्या अर्थाने देवीची साधना, उपासना ठरेल. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT