MLAs Nitin Pawar, Jayshree Pawar, Tehsildar Rohidas Warule and priest class present at Panchamrit Mahapuja in the second mass of Adimaya's Sharadiya Navratri festival on Friday. esakal
नाशिक

Nashik Navratri Festival 2024: ध्यान, ज्ञान अन त्यागाचे स्वरूप ‘सप्तशृंगी’! आदिशक्तीस निळ्या रंगाचा शालू नेसवून साजशृंगार, पूजा

सकाळ वृत्तसेवा

वणी : आद्यस्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर आदिमायेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची जल्लोषात सुरुवात झाली आहे. प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसांत आदिमायेच्या विविध नऊ रूपांचे दर्शन घडते. शुक्रवार (ता. ४)ची दुसरी माळ देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगीस निळ्या रंगाचा शालू नेसवून साजशृंगार करीत पूजा बांधण्यात आली होती. (Saptasringi devi form of meditation knowledge sacrifice)

नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांपैकी एक किंवा दुसऱ्या रूपाशी संबंधित आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीशी संबंधित आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्याने दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले.

देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या आशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर श्री भगवतीच्या नवरात्रोत्सवात आजच्या दुसऱ्या माळेच्या मुहूर्तावर व शुक्रवार हा देवीचा वार समजला जात असल्याने सुमारे ५० हजार भाविकांनी गडावर हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. (latest marathi news)

दुसऱ्या माळेला कळवणचे आमदार नितीन पवार, जयश्री पवार व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त तथा तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या हस्ते श्री भगवतीस पंचामृत अभिषेक, महापूजा करण्यात आली. या वेळी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यकारी अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर प्रमुख गोविंद निकम, सुनील कासार, ग्रामस्थ शांताराम गवळी आदींसह ग्रामस्थ तथा भाविक उपस्थित होते.

या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

अर्थ : हे आई ! तू सर्वव्यापी आणि ब्रह्मचारिणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबे, मी तुला पुनः-पुन्हा नमस्कार करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मागील वेळी निसटता पराभव झालेल्या 'या' नेत्याला 'जनसुराज्य'कडून पुन्हा उमेदवारी; आमदार कोरेंची घोषणा

Dussehra 2024 Vastu Tips: आज विजयादशमीनिमित्त लावा शनिदेवाचे 'हे' रोप , साडेसातीसह संकटे होतील दूर

Dussehra Melava 2024 Live Updates: दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे नारायण गडावर दाखल

Explained :Mohammed Shami ची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड का नाही झाली? त्याने केलेला दावा चुकीचा निघाला

Akshay Purjalkar : वडिलांच्या कष्टाचे फेडले पांग! पाणीपुरी विक्रेत्याचा मुलगा झाला वैद्यकीय अधिकारी

SCROLL FOR NEXT