Teachers Constituency Election esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी! शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर महायुतीने विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. असे असताना नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरविला आहे. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. (NCP has fielded candidates against Mahayuti candidate in Nashik Teacher Constituency)

यातच, उतरविलेल्या उमेदवाराबाबत ‘राष्ट्रवादी’ सक्रिय झाला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नाशिकमध्ये येत शिक्षण निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पक्षाने उमेदवार उतविल्याचे जाहीर केले. त्यामुळे महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. नाशिक शिक्षक विधान परिषदेसाठी महायुती आणि महाआघाडी यांच्याकडून उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

त्यातही शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यातच लढत असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही धुळे येथील महेंद्र भावसार यांना एबी फॉर्म दिल्याने त्यांनी महायुतीतील उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्षातील एकाही स्थानिक नेत्याने प्रचारासाठी पुढाकार घेत उमेदवाराबाबत अधिकृत माहिती दिली नव्हती.

यातच, महायुतीच्या उमेदवारांसाठी झालेल्या बैठकीस ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी दांडी मारली; तर आमदार अॅड. माणिकराव कोकाटे व सरोज अहिरे यांनी हजेरी लावली. बैठकीनंतर, ‘राष्ट्रवादी’ने उमेदवार उतरविला आहे, याबाबत आमदार कोकाटे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीतील दोन उमेदवार रिंगणात कसे, याबाबत वरिष्ठ पातळीवरही चर्चा होत असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण आहे. (latest marathi news)

हा गोंधळ दूर करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नाशिकमध्ये येत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अॅड. भावसार हे आपले अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर त्यांनी उमेदवार निवडून आणण्यासाठीची रूपरेषा सविस्तरपणे मांडली. त्यामुळे आता महायुतीत सर्व काही आलबेल नसून, विधान परिषदेत ‘राष्ट्रवादी’ने नाशिक विभाग मतदारसंघात बंडखोरी करून युतीविरोधात उमेदवार दिला असल्याचे स्पष्ट झाले.

बैठकीस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, श्रेयांश भावसार, अमर पाटील, गौरव गोवर्धने, योगेश मिसाळ, चेतन कासव, ऋषीकेश पिंगळे, रोहित पाटील, आदित्य गव्हाणे, नीलेश पेलमहाले, मुकेश शेवाळे, अमोल नाईक, संदीप दिघोळे, विशाल डोके, शुभम उगले, सोनू वायकर, शुभम महाजन, राहुल सहाणे, सचिन कालासरे, साहेबराव ढगे, संतोष भुजबळ, करण ढुबे, राहुल पाठक, प्रफुल्ल पाटील, रोशन कदम, आशुतोष चव्हाण, अमर जगताप आदी उपस्थित होते.

बैठकीत लोकप्रतिनिधी अनुपस्थित

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. जिल्हाध्यक्ष, आमदार यांसह विविध तालुक्यांमध्ये मोठ्या पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांची या बैठकीत अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यातील एकही आमदार बैठकीस उपस्थित नव्हता. त्यामुळे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी असली, तरी पदाधिकारी का आले नाहीत, अशी चर्चा रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT