During desilting in Igatpuri silt free dam project esakal
नाशिक

Nashik News : इगतपुरीत गाळमुक्त धरण उपक्रमाची गरज; तालुक्यातील 7 धरण कोरडीठाक

सकाळ वृत्तसेवा

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुका म्हणजे पावसाचे माहेरघर, धरणांचा तालुका. वैतरणा, भावली, भाम, मुकणे, कडवा, वाकी खापरी सारख्या धरणांतून मुंबई नाशिकसह गोदावरी खोऱ्यात पाणी सोडले जाते. राज्यातील अनेक भागाची तहान भागवणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील धरणांनी पाच वर्षानंतर पहिल्यांदा तळ गाठला. सात धरणे आज कोरडी ठाक पडली आहेत. (Need for silt free dam initiative in Igatpuri)

प्रशासनाने नाशिकला सुरू केलेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजनेनुसार इगतपुरी तालुक्यातील धरणांतील गाळ काढण्यासाठी हा उपक्रम सुरु केला तर येथील धरणातील गाळ कमी होऊन पाण्याची क्षमता वाढेल. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांना कलम ८० जी नुसार करसवलत तसेच सी एस आर अर्थात सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत मदत करण्यात आली तर नक्कीच ही योजना सफल होईल.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असून अशीच काहीशी परिस्थिती धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला असून सर्वच धरणे कोरडी ठाक ओसाड पडली आहे. पावसाळ्यात नद्या नाले ओहळ तलावासह प्रमुख जलश्रोतांमार्फत धरणांत गाळ साचतो. त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट होत आहे.

भविष्यात पाणी टंचाई भीषणतेला गाळ मुख्य कारण ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. धरणांची पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार योजना आहे. इगतपुरीतील स्थानिक शेतकऱ्यांना सहभाग घेता येऊ शकतो. (latest marathi news)

शेतकरी गाळ काढून नेऊ शकतात. खासगी व सार्वजनिक भागीदारी म्हणून गाळ उपसण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्री व इंधनावरील खर्च शासनाकडून तसेच सी एस आर च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून धरणांच्या तालुक्यात ही योजना राबविली तर पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

योजनेतून फायदा

- प्रति दिन एका यंत्राने १० तासात १० लाख लिटर क्षमता वाढ

- धरणांतील गाळाचा शेतजमिनी सुपीक करण्याला मदत

- खडकाळ माळरानावरील क्षेत्र पिकांसाठी जमीनयुक्त

- गाळ मुक्त धरणामुळे शहरांच्या पाणीपुरवठा क्षमतेत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT