Tilwan Bari road cutting Ghat in Wadi Chaulher hill range. esakal
नाशिक

Nashik News : तिळवणबारी बनतेय मृत्यूचा सापळा! कळवण-बागलाण तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष

Nashik News : आदिवासी पट्ट्यातील ३५ गावांना कळवण तालुक्याला जोडणाऱ्या तिळवण बारी हा घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून शासनाच्या उदासीनतेमुळे तिळवण बारीची दुरवस्था झाल्याचा आरोप होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : पूर्वीच्या कळवण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील ३५ गावांना कळवण तालुक्याला जोडणाऱ्या तिळवण बारी हा घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून शासनाच्या उदासीनतेमुळे तिळवण बारीची दुरवस्था झाल्याचा आरोप होत आहे. (Neglect of government towards road connecting Kalwan Baglan taluka)

कळवणचे माजी आमदार स्वर्गीय ए. टी. पवार यांच्या कल्पकतेतून वाडी चौल्हेर डोंगराच्या पश्चिमेकडील ३५ ते ४० फूट खडकाचा सुळका तोडून दोन्ही तालुक्यांमध्ये १५ ते २० किलोमीटर अंतराचा शॉर्टकट तयार केला होता. चाचेर (ता. कळवण) ते तिळवण (ता. बागलाण) या मुख्य रस्त्यावरील हे घाट कटिंग १९८५ मध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

याच तिळवण बारीमुळे कळवण व बागलाण हे दोन्ही तालुके जोडले गेले होते. दळणवळणाचे प्रमुख साधन बनलेल्या तिळवण ते चाचेर रस्त्यावरील तिळवण बारीतील उंचच उंच अशा दगडांच्या ढाचा पावसाने रस्त्यावर कोसळून वाहतुकीला अडथळा तयार होतो. पावसाळ्यात हे दगड कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने वाहतूक ठप्प होऊन हेच दगड-गोटे अपघातास कारणीभूत ठरतात.

तीव्र चढाई व डोंगर कपारीतून काढलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ‌‌दिशादर्शक, गतिरोधक किंवा धोक्याच्या सूचना देणारे फलक लावले खरे. मात्र रेडियम पट्ट्या नसल्याने वाहनधारकांना पुढील संभाव्य धोक्याची कल्पना येत नसल्याने जीव मुठीत धरून राम भरोसे प्रवासी वाहतूक सुरू आहे. (latest marathi news)

बागलाण तालुक्यातील ३५ गावांचा कळवण तालुक्यातील गावांशी संपर्क होण्यासाठी तिळवण, बेज, भादवण, चाचेर, बिजोरे या रस्त्याचे थेट बागलाण तालुका हद्दीपर्यंत डोंगर फोडून वाहतुकीसाठी शासनाकडून राज रस्ता तयार केला होता. सुरवातीस १५ ते २० वर्षे खडीकरण असलेल्या या तिळवण बारी घाट रस्त्याचे २०१४-१५ मध्ये डांबरीकरण झाले.

रहदारी योग्य रस्ता झाल्याने इतर पर्यायी मार्गांपेक्षा वाहतुकीसाठी सर्वात जवळचा म्हणून दोन्ही तालुक्यांतील वाहनधारकांनी या रस्त्याला प्राधान्य दिल्याने शेकडो वाहनांची ये-जा या तिळवणबारीतून सुरू असते. रस्त्यावर काही ठिकाणी अत्यंत तीव्र वळण असून तर काही ठिकाणी तीव्र उतार आहेत.

उतारावरील खडकांना वर्षानुवर्षे उन्हं, वारा, पाऊस लागल्याने खडकांची झीज झाली आहे. त्यामुळे खडकांचा काही भाग तुटून रस्त्यावर कोसळतो. या बारीच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग बागलाण तसेच कळवण दोन्हीही सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. शासनाने या तिळवणबारी घाटाच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना, रहदारी वाहतुकीच्या खुणा, वळण रस्ता, स्पीड ब्रेकर्स टाकून रस्ता रहदारी योग्य करावा, अशी मागणी होत आहे.

सीमावादामुळे दुर्लक्षित

तिळवण बारीची निम्मी हद्द बागलाण तालुक्यात तर निम्मी हद्द कळवण तालुक्यात येत असल्याने जनतेची सुरक्षितता न पाहता सीमावादामुळे तिळवणबारी दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. बारीतील असेच झिजलेले खडक अधांतरी लटकत असून संततधार पावसात रस्त्यावर कोसळण्याची शक्यता असल्याने शासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे.

"तिळवण बारी घाट काटेरी झुडपे वृक्षवेलींनी वेढला गेला आहे. वाढलेल्या वेलींमुळे रस्ता अरुंद बनला असून या रस्त्यात चार चाकी वाहन चालकांत साइड देण्यावरून वाद होतात. मॉन्सून पूर्व दुरुस्त्याही झालेल्या नाहीत. अपघात प्रवण क्षेत्र होऊ नये म्हणून व सर्वसामान्यांना परवडणारी कनेक्टिव्हिटीचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे." - राजेंद्र सोनवणे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT