NET MPSC UPSC Exam : विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) अशा तीन प्रमुख परीक्षा २५ ते २७ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये होणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थींचे अभ्यासाचे नियोजन विस्कळित होणार असल्यामुळे परीक्षांमध्ये किमान चार दिवसांचे अंतर ठेवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. राज्यात एमपीएससी, यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. (3 consecutive days of 3 major exams in august )
जवळपास दहा ते बारा लाख तरुण-तरुणी परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र ऑगस्टमध्ये यूपीएससीची पूर्वतयारी चाचणी परीक्षा २५ ऑगस्टला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा २६ ऑगस्टला, तर यूजीसी नेट परीक्षा तुकडीनुसार २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या तिन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीना कोणती परीक्षा हातून निसटण्याची किंवा त्यावर पाणी सोडावे लागण्याची वेळ येणार असल्याची चिंता अनेक परीक्षार्थी बोलून दाखवीत आहेत. (latest marathi news)
परीक्षांचे वेळापत्रक
यूपीएससी पूर्वतयारी चाचणी
२५ ऑगस्ट
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा
२६ ऑगस्ट
यूजीसी नेट
२१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
''कोणत्याही दोन परीक्षांमध्ये चार ते आठ दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेच्या तारखांनुसार अभ्यासाचे नियोजन करता येईल, त्यांची धावपळ होणार नाही. परीक्षा केंद्र वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असल्याने परीक्षार्थींची धावपळ होत असते, तरी याच्यावर सरकारने तातडीने विचार करावा.''- राहुल पाटील, स्पर्धा परीक्षा असोसिएशन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.