Minister Chhagan Bhujbal while inspecting the work of Shiva Shrishti. Neighboring officers etc. esakal
नाशिक

Nashik News : ‘शिवसृष्टी’तून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख; वैभवात भर घालणाऱ्या देखण्या कामाला गती

Nashik : शिवसृष्टी साकारावी, ही येवलेकरांची कित्येक वर्षांची इच्छा. त्याला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वजन वापरून चालना दिली.

संतोष विंचू

Nashik News : दोनशे वर्ष उत्सवप्रिय आणि ऐतिहासिक वलय लाभलेल्या तात्या टोपेंच्या पैठणीच्या गावात शिवसृष्टी साकारावी, ही येवलेकरांची कित्येक वर्षांची इच्छा. त्याला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी वजन वापरून चालना दिली. आतापर्यंत ११ कोटींचा निधी मंजूर झाला असून, मध्यंतरी रखडलेले काम सध्या वेगाने सुरू आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj from Shiva Srishti )

शिवसृष्टीतून शिवाजी महाराजांचा चालता-बोलता इतिहास येवलेकरांपुढे उभा राहणार असून, शहराच्या वैभवात भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख सांगणारी, त्यांच्या कार्यकर्तृत्वासह त्यांच्या मावळ्यांच्या परिचय देणारी चित्ररूपी शिवसृष्टी राज्यात येवल्याची नवी ओळख तयार करणार आहे.

देखण्या शिवसृष्टीचे एप्रिलमध्ये तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. उपमुख्यमंत्री पवार यांनी शिवसृष्टीसाठी एक रुपयाही कमी पडू देणार नाही, अशी सभेत ग्वाही दिली होती, तर श्री. भुजबळ यांनी माझ्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगत आगळीवेगळी शिवसृष्टी होईल, असे जाहीर केले होते.

त्यानंतर दोन-अडीच महिन्यांतच राज्यात सत्तांतराचे वादळ उठले आणि शिवसृष्टीच्या मंजूर निधीला राजकीय कुरघोडीत ब्रेक लागला. आता अजित पवार वित्त मंत्री व श्री. भुजबळ मंत्री झाल्याने या कामाला गती मिळाली आहे. विंचूर चौफुलीलगत जुन्या पंचायत समितीच्या सुमारे दोन एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.

यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळा, महाराजांच्या आयुष्यातील ठळक घडामोडी व सेनापतींचे चित्रशिल्प, भित्तिचित्रे, ऑडिओ व्हिडिओ हॉल, शिवकालीन शस्रांचे प्रदर्शन, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र आणि कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी, वाहनतळ, उद्यान, टप्पे स्वरूपातील कारंजे व सुशोभीकरण, स्वच्छतागृह व उपहारगृह, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण आदी कामे होणार आहेत.

त्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून दोन कोटी, तर प्रादेशिक पर्यटन योजनेतून चार कोटी, अशा सहा कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली होती. आतापर्यंत ११ कोटींला परवानगी मिळाली आहे.

जुन्या पंचायत समितीच्या जागेवर उंच संरक्षक भिंत पूर्णत्वास गेली असून, इतर कामांना गती मिळाली आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गालगतच शिवसृष्टी असल्याने राज्यातील पर्यटकांसाठी वेगळे आकर्षण ठरणार असून, येवल्याच्या वैभवातही भर पडणार असल्याने हे काम पूर्णत्वास जाण्याची आस शिवप्रेमींना लागली आहे.

शिवसृष्टीची कामे गतीने पूर्ण करा : भुजबळ

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोचवणारा शिवसृष्टी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

शिवसृष्टीची पाहणी मंत्री श्री भुजबळ यांनी केली. त्यावेळी अधिकारी व ठेकेदाराला सूचना दिल्या. शिवसृष्टीचे बांधकाम करताना व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी योग्य नियोजन करावे. आवश्यक निधीची मागणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT